कर्तृत्व आणि दातृत्वाचा संगम चंद्रकांत भोजने..
▪️दिव्यांगांच्या लग्नसोहळ्याला दिली शोभेची झालर..
▪️सुपत्राचे लग्न सामुदायिक विवाह सोहळ्यात करून दिला आदर्श..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.२२: संगमेश्वर तालुक्याचे सुपुत्र आणि मुंबईतील प्रतिष्ठित यशस्वी उद्योजक चंद्रकांत भोजने म्हणजे कर्तृत्व आणि दातृत्वाचा अनोखा संगमच असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. आपल्या कर्तृत्वाने यशाच्या शिखरावर आरूढ झाले असताना देखील पाय सदैव जमिनीवर असणाऱ्या श्री. भोजने यांनी गोरगरीब, गरजूंना सढळ हस्ते मदतीचा हात नेहमीच दिला आहे. अशाच प्रकारचा दिव्यांगांच्या लग्नासाठी हॉल साठीचा प्रस्ताव त्यांच्याकडे दिला. मात्र, ते केवळ हॉल उपलब्ध करून देण्यावरच थांबले नाहीत. तर शेकडो उपस्थितांच्या भोजनाचा खर्च देखील उचलला. मात्र, ह्याची कल्पना कुणालाही येऊन दिली नाही. अशाप्रकारे अनेक दातृत्वाची उदाहरणे देता येतील.
सुपूत्राचे लग्न सामाजिक लग्न सोहळ्यात करून दिला सामाजिक आदर्श
सुपुत्र ऍड. अमोल भोजने एसीबी इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन असताना त्यांच्या लोकीकाप्रमाणे थाटामाटात लग्न करणे अपेक्षित असताना गरिबीची जाण आणि सर्वसामान्यांबद्दल असणारी आत्मियता यामुळे त्यांनी स्वतःच्या चिरंजीवाचे लग्न सामुदायिक लग्न सोहळ्यात संपन्न केले आणि तेथील बहुतांश खर्चाची जबाबदारी उचलून सामाजिक बांधिलकीची जाणीव दाखवून दिली. समाजात श्रीमंत अनेक असतात. परंतु मनाने श्रीमंत असणारी चंद्रकांत बाबल्या भोजने यांच्या सारखी काही विरळच व्यक्ती असतात. त्यांना कोणत्याही प्रसिद्धीचा बडेजाव नको असतो की, कुठे नाव पाहिजे असते. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते. त्याच प्रमाणे श्री. भोजने यांच्या मागे त्यांच्या सौभाग्यवती सुवर्णाताई भोजने या आहेत. त्यांच्या प्रत्येक निर्णयात ताईंचा मोलाचा वाटा असतो. भोजने यांच्या या सामाजिक कार्याचा संस्कार झालेल्या उच्छशिक्षित अशा त्यांच्या सुकन्या पूजा भोजने आणि स्नुषा सौ. सायली भोजने यादखील सामाजिक कार्यात त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन अग्रेसर असल्याच्या दिसून येतात. चंद्रकांत भोजने यांच्या या सामाजिक कर्तृत्वावर समाजातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_