🟥 तुळजाज्ञ आर्केट मधील सोसायटी मधील रहिवाशांची एकी खरोखरच दृष्ट लागावी अशी ; बबन साळगावकर यांचे प्रतिपादन..
🟥 तुळजा आर्केटचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-३०:– तुळजाज्ञ आर्केट मध्ये गेली अनेक वर्षे सोसायटीचा वर्धापन दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करून समाजामध्ये आपण वेगळा आदर्श घालून देत आहात या सोसायटी मधील रहिवाशांची एकी खरोखरच दृष्ट लागावी अशी आहे असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी तुळजा आर्केट च्या वार्षिक स्नेहसंमेलनात अध्यक्ष स्थानावरून बोलताना केले.
सबनिसवाडा येथील तुळजा आर्केट मध्ये दरवर्षी सोसायटीतील रहिवाशांसाठी वार्षिक स्नेहसंमेलन व सत्यनारायणाची पूजा आयोजित केली जाते,यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवून सोसायटीतील मुलांच्या कलागुणांना वाव दिला जातो, या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घघाटन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगांवकर. सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष सिताराम गावडे , तुळजा आर्केट चे अध्यक्ष संजय गावडे,चंद्रकांत कदम , संतोष पाताडे,श्री व सौ पिंगे यांच्या उपस्थितीत दिप प्रज्वलनाने करण्यात आले.
यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांनी या तुळजा आर्केट मधील सर्व रहिवाशांनी सावंतवाडी शहरातील समस्या व सुधारणा यावर चर्चा करून उठाव करणे गरजेचे आहे, ज्या ठिकाणी आम्ही चुकीच्या कामाच्या विरोधात उभे राहतो त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला साथ द्या असे भावनिक आवाहन यावेळी बोलताना केले.
माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांनी या सोसायटीत ऐक्याचे दर्शन दिसते जिथे ऐक्य व शांतता असते तिथे समृद्धी येते असे सांगून तुळजा आर्केट मधील रहिवाशांना स्नेहसंमेलनच्या शुभेच्छा दिल्या तर सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष सिताराम गावडे यांनी आपली लहान मुले म्हणजे देशाचे भावी बलस्थान आहे या मुलांकडे लक्ष देताना त्यांच्या हट्ट पुरे करत जाऊ नका ,चांगले काय वाईट काय याची मुलांना जाणीव करून द्या असे आवाहन केले. यानंतर सोसायटीतील मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झालेत.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

