प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी न मिळाल्याने स्वप्नभंग
*🟥 प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी न मिळाल्याने स्वप्नभंग*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,दि.२९*:-सावंतवाडी शहरातील झिरंगवाडी येथे शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजुरी मिळालेल्या नऊ लाभार्थ्यांनी बँकांचे कर्ज काढून आपली छोटीशी घरे बांधली. परंतु शासनाकडून या योजनेंतर्गत एकही हप्ता अद्याप मिळाला नाही. लाभार्थी घरांचे स्वप्न पूर्ण होणार की नाही, या संकटात सापडलेले आहेत. शासनाकडून या योजनेअंतर्गत हप्ते मिळतील म्हणून लाभार्थ्यांनी बँकांकडून कर्ज घेऊन छोटी-छोटी घरे बांधली. दोन वर्षे झाली तरी अद्यापही हप्ते न मिळाल्याने लाभार्थी बँकेच्या कर्जापोटी आर्थिक संकटात सापडले आहेत. याबाबत त्यांनी पालिका मुख्याधिकारी, प्रांताधिकारी, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचीही भेट घेतली होती. एक वर्ष उलटून गेले तरी अद्यापही पहिला हप्ता मिळाला नाही. २०२२ मध्ये शहरी लाभार्थ्यांची यादी मंजूर झाली होती. या योजनेअंतर्गत नऊ लाभार्थ्यांनी छोटीछोटी घरेही उभारली. त्यासाठी त्यांनी आगाऊ बँकेचे कर्जही घेतले. मिळणारे हप्ते वेळेत मिळाल्यावर बँकेचे कर्जही फेडणार होते. परंतु प्रशासनाचे व मंत्र्यांचे लक्ष वेधूनही दोन वर्ष उलटून गेली तरी अद्यापही योजनेचे हप्ते मिळालेले नाहीत. हफ्ते न मिळाल्यास गरिबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार की अपूर्ण राहणार या संकटात हे लाभार्थी सापडले आहेत. तसेच बँकांचे कर्ज परतफेड न झाल्यास संकट उभे राहू शकते, मग आम्ही असे लाभार्थी उघड्यावर राहू शकतो, या विवंचनेत लाभार्थी आहेत. त्यामुळे शासनाने याचा गंभीर विचार करून सर्व हप्ते वेळेत मिळावे व दिलासा द्यावा, अशी मागणी लाभार्थ्यांतर्फे सुरेश मनोहर बोंद्रे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा लाभार्थ्यांना न्याय हक्कासाठी नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असेही इशारा सुरेश बोंद्रे यांनी म्हटले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

