मला ॲक्शन पाहिजे; पालकमंत्री उदय सामंत यांनी कोकण विभागाचे पोलिस महानिरिक्षक संजय मोहिते यांना ठणकावले
▪️अवैध दारू धंद्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याने पालकमंत्री यांनी व्यकत केली तीव्र शब्दात नाराजी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.२०: अवैध दारू धंद्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यकत केली. तसेच हे कुठे तरी थांबणे गरजेचे आहे. असे म्हणत थेट कोकण विभागाचे पोलिस महानिरिक्षक संजय मोहिते यांनाच भ्रमणध्वनी वरून संपर्क केला आणि सर्व वस्तूस्थीती त्यांच्या कानावर घातली व मला ॲक्शन पाहिजे असे ठणकावून सांगितले. त्यामुळे आता तरी पालकमंत्र्यांच्या दणक्याने अवैध धंद्यावर जरब बसते का, हे बघावे लागणार आहे.
पालकमंत्री उदय सामंत हे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनिमित्त मळगाव येथे आले होते. यावेळी त्यांच्या समोर कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी अवैध धंद्याबाबत कैफियत मांडली. तसेच तालुकाप्रमुख रूपेश राउळ यांनीही निवेदन दिले. त्यानंतर पत्रकार परिषदेत अवैध धंदे तसेच टेम्पो चालकाचा खुन तसेच आंबोली घाटात टाकण्यात आलेला मृतदेह यामध्ये अवैध दारू व्यवसायातीलच युवक अडकले आहेत. याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांना विचारले असता त्यांनीही चिंता व्यकत केली.
हे सर्व प्रकार गंभीर आहेत. अवैध धंदे बंद होणे गरजेचे आहे. पोलिसांनी वेगळी यंत्रणा उभी केली पाहिजे यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. या अवैध धंद्यांना सहकार्य करणारे कोणीही असूदे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे यासाठी उत्पादन शुल्क विभागाला जोडीला घ्या आणि कारवाई करा पण हे सर्व थांबणे गरजेचे असून, अल्पवयीन मुले यामध्ये सहभागी होत असतील त्यासारखे वाईट काहि नाही. पोलिसांनी आपली पेट्रोलिंगही वाढवणे गरजेची आहे, असे म्हणत पालकमंत्री थेट कोकण विभागाचे पोलिस महानिरिक्षक संजय मोहिते यांना फोन केला. यावेळी मोहिते यांनी आपण सिंधुदुर्गमध्ये असून, सावंतवाडीमध्ये मला अवैध दारू धंद्याबाबत माहीती मिळाली. मी यावर गंभीर आहे. पण या धंद्यांचा समूळ उच्चटन करण्यासाठी नक्कीच मी पुढाकार घेईन वेगवेगळी पोलिस पथके तयार केली जातील, असे आश्वासन दिले. तसेच आपण याबाबत बैठक घेऊ, असे म्हणत मंत्री सामंत हे ओरोसकडे रवाना झाले.
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_