कोकणसिंधुदुर्ग

दिलासादायक बातमी;आता जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्यांना होम क्वारंटाईन राहण्याची गरज नाही

पालकमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहीती

सिंधुदुर्ग,दि.१२: आता जिल्हय़ाबाहेरून येणाऱ्यांना होम क्वारंटाईन ठेवण्यात येणार नाही, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

कोरोना संसर्ग रोखण्याच्या नियमावलीत थोडीफार शिथीलता आणण्यात आली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत आहे. मात्र, मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हय़ाबाहेरून जिल्ह्यात येणाऱ्यांना असणारा १४ दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा नियम शिथिल करण्यात आला आहे. मात्र, जे लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत व होम आयसोलेशनमध्ये आहेत, त्यांना १४ दिवस क्वारंटाईन राहवेच लागणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!