विनोद दळवी, अमोल गोसावी उत्कृष्ट पत्रकार तर बेस्ट स्टोरी अवार्ड झुंझार पेडणेकर यांना जाहीर..

▪️मालवण पत्रकार समितीचे पुरस्कार ५ जानेवारी रोजी मामा वरेरकर नाट्यगृहात होणार वितरण..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : मालवण

🎴मालवण,दि.१९: मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने सन २०१९-२० या वर्षासाठी दिला जाणारा कै. नरेंद्र परब स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार दैनिक सकाळचे ओरोस प्रतिनिधी विनोद दळवी यांना तर कै. अ‍ॅड. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार दैनिक लोकमतचे चौके वार्ताहर अमोल गोसावी यांना जाहीर करण्यात आला. त्याचबरोबर पत्रकार समितीच्या वतीने यावर्षीपासून नव्याने जाहीर करण्यात आलेला ‘बेस्ट स्टोरी अवॉर्ड’ हा विशेष पुरस्कार दैनिक प्रहारचे मसुरा प्रतिनिधी झुंझार पेडणेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कारांची घोषणा पत्रकार समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल देसाई यांनी पत्रकार समितीच्या विशेष सभेत केली.

दरम्यान, पुरस्कारांचे वितरण ५ जानेवारीला मालवण पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

पत्रकारिता क्षेत्रात गेली अनेक वर्षे दिलेल्या योगदानाबद्दल मालवण पत्रकार समितीचे जेष्ठ सदस्य पत्रकार डी. टी. मेथर, विवेक नेवाळकर, पी. के. चौकेकर, सौगंधराज बादेकर यांना पत्रकार समितीच्या वतीने विशेष सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.

मालवण तालुका पत्रकार समितीची विशेष सभा शनिवारी शासकीय विश्रामगृह येथे समिती अध्यक्ष प्रफुल्ल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्ष अमित खोत, सचिव प्रशांत हिंदळेकर, खजिनदार कृष्णा ढोलम, जिल्हा कार्यकारिणी सदस्य विद्याधर केनवडेकर, जेष्ठ पत्रकार नंदकिशोर महाजन, मनोज चव्हाण, महेश कदम, विनोद दळवी, संग्राम कासले, परेश सावंत, सिद्धेश आचरेकर, संतोष हिवाळेकर आदी सदस्य उपस्थित होते.

यावेळी सन २०१९- २० यावर्षीच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांची तसेच बेस्ट स्टोरी अवॉर्ड या विशेष पुरस्कार प्राप्त विजेत्यांची घोषणा करण्यात आली. ५ जानेवारीला पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात होणाऱ्या पुरस्कार वितरण कार्यक्रमास मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, सभापती अजिंक्य पाताडे यांना निमंत्रित करण्याचे यावेळी सर्वानुमते निश्चित करण्यात आले.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!