कोकणक्रीडाशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत; जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सिंधुदुर्गनगरी

🎴सिंधुदुर्गनगरी,दि.18: क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गव्दारा जिल्हयातील उत्कृष्ट खेळाडु, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत क्रीडा संघटक/कार्यकर्ता यांच्या कार्याचा व योगदानाचा गौरव व्हावा. क्रीडा क्षेत्रास प्रोत्साहन मिळावे. यासाठी सन 2020-2021 च्या क्रीडा पुरस्कारासाठी संबंधितांनी दिनांक 31 डिसेंबर 2020 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.

उत्कृष्ट खेळाडू (1 महिला, 1 पुरुष, 1 दिव्यांग खेळाडू) गुणवंत क्रीडा मार्गदर्शक 1 व गुणवंत क्रीडा संघटक/कार्यकर्ता 1  यांच्या कार्याचे, योगदानाचे मुल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व क्रीडा क्षेत्रास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2002 पासून देण्यात येतो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडू, मार्गदर्शक व क्रीडा संघटक/कार्यकर्ता यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सन 2020-21 च्या पुरस्कार वितरणासाठी या कार्यालयामार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पुरस्कारामध्ये प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रु.10,000/- असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. खेळाडू पुरस्काराकरिता 1 जुलै 2015 ते 30 जून 2020 पर्यतची कामगिरी,कार्य ग्राहय धरले जाईल. क्रीडा मार्गदर्शक व संघटक/कार्यकर्ता पुरस्काराकरीता 1 जुलै 2010 ते 30 जून 2020 पर्यंतची कामगिरी,कार्य ग्राह्य धरले जाईल.

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी खालील खेळांचा विचार केला जाईल.
1 धनुर्विद्या (आर्चरी), 2 मैदानी क्रीडा स्पर्धा (ॲथलेटिक्स), 3 बॅडमिंटन, 4 बिलियर्डस ॲण्ड स्नुकर 5 कॅरम, 6 बुध्दीबळ (चेस), 7 सायकलिंग,8 तलवारबाजी (फेन्सिंग), 9गोल्फ, 10 जिम्नॅस्टिक्स, 11 अश्वरोहण (हॉर्स रायडिंग), 12 लॉन टेनिस, 13 मल्लखांब, 14 नेमबाजी, 15 स्केटिंग, 16 स्क्वॅश, 17 जलतरण (स्विमिंग डायव्हिंग, वॉटरपोलो), 18 टेबलटेनिस, 19 ट्रायथलॉन, 20 आटयापाटया, 21 बास्केटबॉल, 22 शरीरसौष्ठ (बॉडीबिल्डिंग), 24 क्रिकेट,      25 फुटबॉल, 26 हॅण्डबॉल, 27 हॉकी, 28 ज्युदो, 29 कबड्डी, 30 कयाकिंग/कॅनोईंग, 31 खो-खो, 32 भारोत्तोलन (पॉवरलिफ्टिंग), 33 रोईंग, 34 तायक्वाँदो, 35 व्हॉलीबॉल, 36 वजन उचलणे (वेटलिफिटंग), 37 कुस्ती (रेसलिंग), 38 वुशू, 39 यॉटींग

पुरस्काराचे थोडक्यात निकष खालीलप्रमाणे आहेत.
1) गुणवंत खेळाडू :
या पुरस्काराअंतर्गत तीन पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून एक महिला खेळाडू, एक पुरुष खेळाडू व एक दिव्यांग खेळाडू यांना सदरचा पुरस्कार देण्यात येणार आहे.

1) संबंधित जिल्हयामध्ये खेळाडूने लगतपूर्व 5 वर्षापैकी 2 वर्ष त्या जिल्हयाचे मान्यताप्राप्त्‍ खेळांच्या अधिकृत स्पर्धामध्ये प्रतिनधित्व् केले असले पाहिजे

2) खेळाडूंची मान्यताप्राप्त् खेळाच्या अधिकृत राज्य्/राष्ट्रीय अंजिक्यपद स्पर्धामधील पुरस्कार वर्षाच्या राज्य् व राष्ट्रीय स्तरावरील वरिष्ठ्/कनिष्ठ्, शालेय, ग्रामीण व महिला (पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियान) मधील राष्ट्रीय स्तरावरील कामगिरी लक्षात घेण्यात येईल. यापैकी उत्कृष्ट् ठरणाऱ्या तीन वर्षाच्या कामगिरीचा विचार करण्यात येईल.

3) खेळाडूने त्याचा अर्ज विहित नमुन्यात व विहित मुदतीत या कार्यालयात सादर करावा.

4) खेळाडूने स्पर्धांच्या मुळ प्रमाणपत्रांच्या स्वाक्षांकित प्रती सोबत सादर करणे आवश्यक राहील.

5) खेळाडूंचा अर्ज अधिकृत जिल्हा संघटनेमार्फत्‍ शिफारास करुन सादर करणे आवश्यक राहील तथापि अपवादात्मक परिस्थितीत खेळाडू वैयक्तिकरित्या अर्ज करु शकतील

6) पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग 15 वर्ष वास्त्‌व्य् असले पाहिजे.

2) क्रीडा मार्गदर्शक :
1) पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग 15 वर्ष वास्तव्य् असले पाहिजे

2) क्रीडा मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रात सतत दहा वर्ष क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केले पाहिजे व त्याने वयाची 30 वर्ष पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. गुणांकनाकरिता त्या जिल्हयातील खेळाडूंची कामगिरी ग्राहय धरली जाईल.

3) एका जिल्हयामध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त्‍ करणारी व्यक्ती राज्यातील अन्य् जिल्हयात जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही.

4) एकदा एका खेळामध्ये किंवा एका प्रवर्गामध्ये जिल्हा पुरस्कार प्राप्त् केलेली व्यक्ती पुन्हा त्याच खेळात किंवा प्रवर्गात जिल्हा क्रीडा पुरस्काराकरीता अर्ज करण्यात पात्र असणार नाही.

5) सांघिक अथवा वैयक्तिक मान्यता प्राप्त क्रीडा प्रकारात नॅशनल गेम्स, वरीष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत प्रतिनिधीत्व केलेला खेळाडू अथवा राज्य,जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकापर्यंत यश मिळविणारे किमान तीन खेळाडू घडविणारा मार्गदर्शक.

3) गुणवंत संघटक :
1) पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांचे महाराष्ट्रात सलग 15 वर्ष वास्तव्य असले पाहिजे

2) क्रीडा संघटक/कार्यकर्त्याने सतत दहा वर्ष महाराष्ट्रात क्रीडा विकासासाठी भरीव योगदान दिले असले पाहीजे व त्याने वयाची 30 वर्ष पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. गुणांकनाकरीता त्या जिल्हयातील कामगिरी ग्राहय धरली जाईल.

जिल्हा क्रीडा पुरस्कार 2020 करीता विहित नमुन्यातील अर्ज, पुरस्काराच्या अटी व शर्ती इतर माहितीसाठी इच्छुकांनी व्यक्तिश: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुख्य प्रशासकीय इमारत येथे कार्यालयीन वेळेत अर्ज प्राप्त करुन घेऊन सदरचे परिपूर्ण अर्ज दि. 31 डिसेंबर 2020 पर्यंत कार्यालयात सादर करावेत. मुदती नंतर येणारे अर्ज स्विकारण्यात येणार नाही, असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विजय शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले  आहे.

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!