जिल्हास्तरीय युवा महोत्सवासाठी स्पर्धकांनी प्रवेशिका सादर कराव्यात; जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सिंधुदुर्गनगरी
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.२२: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दि. २५ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११:०० वाजता ऑनलाईन/व्हर्चुअल पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे. यासाठी स्पर्धकांनी प्रवेशिका सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे. जिल्हास्तरीय युवा महोत्सवात पुढीलप्रमाणे स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

स्पर्धेचे नियम पुढील प्रमाणे आहेत.
१) सहभागी युवा १५ ते २९ वयोगटातील असावा.(युवा वयोगटाची व्याख्या केंद्र शासनाने वेळोवेळी निश्चित केलेल्य निकषाप्रमाणे राहील.) ०१ जानेवारी १९९२ ते ०१ जानेवारी २००६ यामधील जन्मतारीख असावी.
२) ज्या बाबीना साथ संगत आवश्यक आहे.त्या कलाकारांना वयोमर्यादा लागू नाही.
३) एकांकिकेमध्ये सहभागी होणारे सर्व युवा कलाकार तसेच एकांकिका लेखक, निर्माता, दिग्दर्शक सुद्धा १५ ते २९ वयोगटातील असावेत.
४) सहभागी होणारा युवा हा महाराष्ट्रातील,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहीवासी असावा.
५) कथ्थक, कुचिपुडी, मणिपूरी, ओडीसी, भरतनाट्यम नृत्य सादर करणा-या कलाकारांना पूर्वमुद्रीत ध्वनीफितीवर (कॅसेट,सीडी ) कार्यक्रम सादर करता येईल.
६) लोकगीत, लोकनृत्य या प्रकारातील गीते चित्रपट बाह्य असणे आवश्यक आहे. कॅसेट, रेकार्ड डान्स मान्य केला जाणार नाही.
७) अस्पर्धात्मक बाबीच्या निवडीचे अधिकार मा.आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे यांना राहतील.
८) युवा महोत्सवाच्या दरम्यान येणाऱ्या तक्रारीचे निवारण करण्याकरीता राज्य, विभाग व जिल्हा स्तरावर त्रिसदस्यीय तक्रार समिती नियुक्त करण्यात येईल आणि समितीचा निर्णय अंतिम राहील. पात्र उमेदवाराला त्याच्या संपर्क क्र. वर स्पर्धेची लिंक पाठविण्यात येईल. त्या लिंक च्या सहाय्याने स्पर्धेकाने स्पर्धा दिनांकाला उपस्थित रहावे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५ ते २९ वयोगटातील युवक युवतींनी उपरोक्त युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी दि. २५ डिसेंबर, २०२० सायं.०५.०० वाजेपर्यत आपली प्रवेशिका विहित नमुन्यात,वयाच्या व रहिवाशी दाखल्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुख्य प्रशासकीय इमारत तळमजला ए, ब्लॉक सिंधुदुर्गनगरी येथे कार्यालयीन वेळेत अथवा ई-मेल. sindhusports@yahoo.com वर विहित वेळेत पाठवावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विजय शिंदे यांनी केले आहे.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

