गोव्यातील अवैध दारूचा महापूर सिंधुदुर्गात वाहतोय; राज्य उत्पादन शुल्क अधिकारी सुशेगाद

▪️दारूसाठी पैसे नाहीत म्हणून केला जातोय टेम्पो चालकाचा खून..

▪️दारू माफिया वाढत गेल्यास भविष्यातील परिस्थिती भयावह..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे

🎴सावंतवाडी,दि.१८: ‘संसाराचा सर्वनाश करे दारू, बाटलीला स्पर्श नका करू’ ही शासन मान्य जाहिरात जरी दूरदर्शन वर दाखवली जात असली तरी शासनाचे राज्य उत्पादन शुल्क खाते या जाहिरातीच्या उलटे काम करताना दिसून येत आहे. गोवा राज्यातून करोडो रुपयाची अवैध दारू महिन्यागणिक सिंधुदुर्ग व महाराष्ट्राच्या इतरत्र जिल्ह्यात पोहोचत असताना राज्य उत्पादन शुल्क खाते निद्रिस्त झाले आहे.

या दारूपायी अनेकांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेकांची कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. यावर लिखाण करताना आम्ही अनेक उदाहरणे दिली. कोलगावातील एका ५० वर्षीय महिलेचा याच दारूच्या नशेत  खून झाला व या खुनात १६ व १७ वर्षीय दोन युवक अडकलेत यावर आम्ही वारंवार लिखाण करून जनजागृती करण्याचा आमच्या परीने प्रयत्न केला. मात्र, गेंड्याच्या कातडीचे अधिकारी जागे झाले नाहीत. त्याचाच परिणाम म्हणून दारूसाठी पैसे नाहीत. या कारणासाठी कोल्हापूर येथील एका टेम्पो चालकाचा दोन युवकांनी मिळून पहाटे पाच वाजता खून केला व हा खून आम्ही फक्त दारूसाठी पैसे नव्हते म्हणून केला. असा जबाब संबंधितांनी सावंतवाडी पोलीस स्थानकात दिला. म्हणजेच भविष्य किती भयानक आहे. हे यावरून लक्षात येते.

राज्य उत्पादन शुल्क विभाग व सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस याबाबत गांभीर्याने कधी घेणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. या दोघा युवकांच्या या कृत्याने  कोकण लाईव्ह च्या बातम्यांना पुष्टी मिळाली आहे. आम्ही वारंवार याबाबत आवाज उठवला, लिखाण केले, तरीही ‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो’ असे नाटक राज्य उत्पादन शुल्क ने सुरु केले व काही प्रमाणात दारू पकडण्याचे नाटकही रंगवले. या उत्पादन खात्यातील अधिकारी पैसा खाऊन-खाऊन सुस्तावलेले आहेत. त्यांना कुठून दारु येते, कोणाकडे जाते, दारू विक्रेते कोण-कोण आहेत, याची सर्व खडानखडा माहिती आहे. तरीही त्यांच्याकडून हप्ता मिळत असल्याने हे अधिकारी कारवाई करत नाहीत. भरारी पथक असो, अथवा उत्पादन शुल्काची तत्सम यंत्रणा असो सर्वच पोखरलेले भ्रष्टाचारी आहेत. त्यामुळे विश्वास कोणावर ठेवायचा हा मोठा प्रश्न आहे. गोवा राज्यातून आरोंदा, तेरेखोल, पत्रादेवी मार्गावरून लाखो रुपयाची दारू अद्यापही सिंधुदुर्गात येत आहे. मात्र, तपासणी नाक्यावर पोलीस डोळ्यावर गांधारीची पट्टी बांधून हप्ता मिळत असल्याने मुग गिळून गप्प आहेत. त्यामुळे खेडोपाडी दारू धंदा तेजीत सूरु आहे. तर नवनवीन दारु विक्रेते निर्माण होत आहेत. दारूसाठी पैसे नाहीत म्हणून स्वतःच्या पत्नीचा आई-वडिलांचा खून झाल्याच्या अनेक घटना ताज्या असताना सावंतवाडीतील त्या घटनेने नागरिकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.  तरीही अद्याप हवा तसा उठाव होत नाही.

सत्य बोलणाऱ्याला डांबून ठेवले जाते. त्याला अडचण निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जातात. हे माहिती असतानाही आम्ही यावर सातत्याने उठाव करत आहोत. तो फक्त आणि फक्त भविष्यात युवा पिढी बरबाद होऊ नये यासाठीच! सावंतवाडीतील असे कितीतरी दारू विक्रेते आहेत, त्यांच्याकडची दारू पिऊन अनेक युवकांना आपला प्राण एक-दोन वर्षात गमवावा लागला, तरीही त्याची सत्यता पडताळणी जात नाही. उत्पादन शुल्क अधिकारी केवळ भेट देण्याचे नाटक करून पैसे लुटण्यासाठी भेट देतात. असे आरोप होतात.

त्यामुळे येत्या २६ जानेवारी रोजी राज्य उत्पादन शुल्काच्या कार्यालयासमोर नागरिकांच्या उपस्थित उपोषण केले जाणार आहे. जेणेकरून या गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना जाग येईल व गोव्यातून येणारी अवैध दारू कायमची बंद होईल.

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*♦न्यूज एडिटर : गुरुनाथ राऊळ*
*📱संपर्क : +919422686976*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!