सिंधुदुर्ग, राजकोट किल्ला जगाच्या नकाशावर अधोरेखित
*🟥 सिंधुदुर्ग, राजकोट किल्ला जगाच्या नकाशावर अधोरेखित*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण,दि-२४:-* मालवण म्हटलं की, सिंधुदुर्ग किल्ला डोळ्यासमोर येतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सागरी किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला होय. त्यांनी आरमाराची स्थापना केली म्हणूनच छत्रपती शिवरायांना भारतीय आरमाराचे जनक म्हणून ओळखले जाते. याच पार्श्वभूमीवर ४ डिसेंबर रोजी भारतीय नौसेना दिन तारकर्ली येथे साजरा होत आहे ही जिल्हयाच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कणकवली येथील कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी सांगितले. राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वगोड बोलत होते. यावेळी ते म्हणाले, या नौसेना दिन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त राजकोट- सर्जेकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा सार्वजनिक बांधकाम व नौसेना विभागामार्फत उभारला जात आहे. राजकोट किल्ल्याचे अवशेष आता दिसत नाहीत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राजकोट किल्ल्यावरील मोकळ्या जागेत नव्याने किल्ल्याचे बांधकाम होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत किल्ल्याचा आराखडा तयार करणे, त्याला मंजुरी घेणे, त्याच्या निविदा प्रतिक्रिया राबविणे व बांधकाम करून घेणे हे फक्त अवघ्या दोनच महिन्यात झाले आहे. राजकोट किल्ला बांधण्यासाठी मला मोलाची संधी मिळाली, त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. ॥लकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा राजकोट किल्ला बांधकाम आणि शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीमध्ये सिंहाचा वाटा आहे. राजकोट येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या किल्ल्यावर युद्धाच्या आवेशात असलेल्या छ. शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग आणि राजकोट किल्ला जगाच्या पटलावरती अधोरेखित होईल, यात काही शंका नाही!
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

