नांदगाव दत्त मंदिर नजिक असलेला बस स्टॉप कार ने उडविला ; अपघातात बस स्टॉप वर असलेली कॉलेज विद्यार्थिनी जखमी.
*🟥 नांदगाव दत्त मंदिर नजिक असलेला बस स्टॉप कार ने उडविला ; अपघातात बस स्टॉप वर असलेली कॉलेज विद्यार्थिनी जखमी..*
*🟥 आक्रमक ग्रामस्थांच्या पवित्र्यानंतर हायवे प्राधिकरण दाखल होत बस स्टॉप मागे घेण्याचे दिले आश्वासन..*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*
*🎴कणकवली, दि-२४:-* मुंबई गोवा महामार्गावर क्र. 66 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव पाटीलवाडी येथे भरधाव कार चालकाचा कार वरील नियंत्रण सुटल्याने थेट येथील दत्तमंदिर बस स्टॉपला धडक देत कार महामार्गावर विरूद्ध दिशेने पटली झाली तर बसस्टॉप जमिनदोस्त होत नुकसान झाले.या अपघातात बसस्टॉप मधील एक काॅलेज युवती गंभीर जखमी झाली असून इतरांनी प्रसंगावधान बाळगून बाहेर आल्याने मोठा अघात टळला.सदरचा अपघात सकाळी ८:३० च्या सुमारास घडला.
दरम्यान अपघात स्थळी आक्रमक भूमिका नांदगाव ग्रामस्थांनी घेतली होती की , हायवे प्राधिकरण चे अधिकारी जोपर्यंत अपघात स्थळी येत नाही तोपर्यंत वाहन हलविणार नसल्याचा पवित्रा घेतला असल्याने अखेर हायवे प्राधिकरणचे अभियंता शिवनिवार व केसीसी कंपनी चे पांडे दाखल होताच उपस्थित ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडीमार सुरु केला बस स्टॉप पूर्वीपासूनच मागे घेण्याची मागणी केली असताना का घेत नाही? अपघाताला जबाबदार कोण ? यामुळे तातडीने सदर बस स्टॉप मागे घेण्यात यावा अशी जोरदार मागणी करत निकृष्ट दर्जाची बस स्टॉप नको आर सी सी बांधण्यात यावी अशी मागणी उपस्थितांमध्ये झाल्यावर अखेर सदर बस स्टॉप मागे घेण्यात येईल व तात्पुरता साधा निवारा शेड बांधून नंतर आरसीसी बांधण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर संबंधित अपघातग्रस्त गाडी हायवे वरून दूर करण्यात आली.यावेळी घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिस निरीक्षक अमित यादव व पोलीस व ट्रॅफिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कु. प्रेरणा राजेंद्र तांबे,वय 18, रा. नांदगाव बोध्दवाडी ही नेहमी प्रमाणे कणकवली येथे काॅलेजला जाण्यासाठी नांदगाव पाटीलवाडी येथील दत्तमंदिर बसस्टॉपवर मुंबई गोवा हायवेवर बसली होती. यादरम्यान रत्नागिरी वरून गोव्याच्या दिशेने जाणारे स्विफ्ट कार चालक श्री. निनाद सुभाष शिरदनकर हे जात असताना नांदगाव पाटीलवाडी येथे आले असता त्याचा कारवरील ताबा सुटल्याने त्याची कार थेट बसस्टॉपमध्ये घुसली. यानंतर बसस्टॉप कोसळून जमिनदोस्त होत कार गोव्याच्या दिशेने जात असताना पुन्हा पलटी होत रत्नागिरीच्या दिशेने तोंड होत एका बाजूस पलटी झाली. या अपघातात बसस्टॉप मधील कु. प्रेरणा हीच्या पायाला गंभीर दुखापत झाली तर बाकी प्रवासी तेथून बाजूला जाण्यास यशस्वी झाले अन्यथा मोठा अघात झाला असता उपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत मदतकार्य करीत जखमी कु. प्रेरणा हीला कणकवली येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी कणकवली पोलीस चंद्रकांत माने व इतर घटनास्थळी दाखल होत प्राथमिक माहिती घेत पंचनामा केला तर सरपंच रविराज मोरजकर, हायवे पोलीसासह ग्रामस्थांनी वाहतूक सुरळीत करण्यास मदतकार्य केले. दरम्यान या ठाकाणी बसस्टॉपला हा हायवेच्या लेनला लागूनच असल्याने बस ही हायवेवरच थांबत प्रवासी बसत असतात यामुळे बसस्टॉपबाबत वारंवार तक्रारी देऊनही प्रश्न मार्गी न लागल्याने ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला. अपघाताचा अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

