पक्षकारांची तडजोडीची भूमिका घेऊन वाद राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मिटवावा; दिवाणी न्यायाधीश श्रीमती आर.आर. बेडगकर
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.१२: कोरोनाच्या संकटामुळे बँकांनी वसुली व्हावी म्हणून पक्षकारांची तडजोडीची भूमिका घेऊन वाद राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मिटवावा असे आवाहन तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा, दिवाणी न्यायाधीश श्रीमती आर. आर. बेडगकर यांनी केले. सावंतवाडी येथील दिवाणी न्यायालयात आज राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी सरकारी वकील अँड. स्वप्नील कोलगावकर, जेष्ठ पक्षकार शंकर नातू, सहाय्यक अधीक्षक आर आर तारी, वरिष्ठ लिपिक सौ. एन.एम. गीरप, कनिष्ठ लिपिक सागर मालवणकर, विजय पवार, नितीन जानवेकर, आर.जी. नेरूरकर, पक्षकार, बॅंक प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
यावेळी दिवाणी न्यायाधीश श्रीमती आर. आर. बेडगकर म्हणाल्या, दिवाणी व फौजदारी स्वरूपाची प्रकरणे पक्षकारांनी तडजोडीने मिटवावी. बँकेच्या प्रतिनिधीने देखील बँकेची वसुलीसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तडजोडीची भूमिका घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले
या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दिवाणी व फौजदारी कडील प्रलंबित १५३ प्रकरणांपैकी ११ प्रकरणे निकाली निघाली.त्यात दिवाणी प्रलंबित ५५९ पैकी १ तर फौजदारी ९४ पैकी १० प्रकरणी निर्णय घेतला. आज दिवाणी व फौजदारी स्वरूपाच्या १५३ खटल्यात पैकी अकरा खटले निकाली निघाल्याने पंधरा लाख ८१ हजार ९५७ रुपये वसूल झाले तसेच वादपूर्व प्रकरणात ५६९ प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी ७४ प्रकरणे निकाली होऊन दोन लाख ४५ हजार ०६१ रुपये वसूलीचा निर्णय घेतला.
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

