पालकमंत्री उदय सामंत यांचे जि.प.च्या निधीला कात्री लावण्याचे काम; बांधकाम सभापती बाळा जठार
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.१२: गावच्या शैक्षणिक विकासात सर्वांची एकजूट कायमस्वरूपी असली पाहिजे. जि.प. च्या माध्यमातून अनेक शैक्षणिक उपक्रम व योजना पारदर्शक व प्रामाणिकपणे राबविल्या जात आहेत. सर्वकाही सुरळीत असताना जि.प.च्या निधीला कात्री लावण्याचे काम पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. केवळ आकसापोटी जाणून-बुजून निधीच्या बाबतीत सापत्नक वागणूक या जि.प. ला त्यांनी दिली आहे. असा आरोप वित्त व बांधकाम सभापती बाळा जठार यांनी केला.
विद्या मंदिर नाधवडे नवलादेवीवाडी, ब्राह्मणदेववाडी प्रशालेच्या मंजूर असलेल्या शाळा दुरुस्ती कामाचा शुभारंभ जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके, समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, महिला व बालकल्याण सभापती माधुरी बांदेकर, पं. स. सभापती अक्षता डाफळे, जि. प. सदस्य सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, बाप्पी मांजरेकर, बंड्या मांजरेकर, गटविकास अधिकारी विद्या गमरे, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. नदाफ, सूर्यकांत कांबळे, शैलजा पांचाळ, मुख्याध्यापक संजय पाताडे, प्रशासक यशवंत वळवी, ग्रामसेवक एन.डी. नदाफ, बाबा कोकाटे व पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते. श्री. जठार म्हणाले, माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे, आ. नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प. चे नियोजनबद्ध काम चालू आहे. पालकांनी विद्यार्थ्यांसांठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा आग्रह धरु नये. जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना पाठवले पाहिजे. असे सांगितले. राजेंद्र म्हापसेकर, शारदा कांबळे, सुधीर नकाशे, संजय पाताडे यांनी मार्गदर्शन केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबा कोकाटे यांनी तर आभार संजय पाताडे यांनी मानले.
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

