माडखोल पावणाई मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन.
*🟥 माडखोल पावणाई मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन..*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : प्रभाकर गावडे*
*🎴सावंतवाडी, दि-१४:-* माडखोल येथील श्री पावणाई मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे. माडखोल देवस्थानच्या वतीने रविवार दि: १५/१०/२३ ते मंगळवार दि: २४/१०/२३ पर्यंत नवरात्रौत्सव थाटामाटात साजरा करण्यात येणार आहे. माडखोल ग्रामदैवत पावणाई देवी ही नवसाला पावणारी, भक्तांच्या हाकेला धावणारी, मनोकामना पूर्ण करणारी अशी प्रचलित आहे. नवरात्रौत्सवात पावणाई देवीच्या मंदिराची साफसफाई करून मंदिर सजवले जाते. मुर्तींना नटवले जाते. मंदिराच्या अंगणात रांगोळी व रोषणाई केली जाते. माडखोल येथील श्री पावनाही मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे घटस्थापने पासून पुढचे नऊ दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत. यात पारंपरिक भजने, आमने-सामने फुगडीचा जंगी सामना तसेच दांडिया , दशावतारी नाटक , युवा कलाकारांचे गायनाचे कार्यक्रम होणार आहेत. यावेळी सर्वानी अपस्थित रहावे असे आवाहन माडखोल पावणाई देवस्थान मानकरी व ग्रामस्थांनी यांनी केले आहे.
