पं. स. इमारतीचा खर्च १५ कोटींवर कसा गेला? – परशुराम उपरकर
*🟥पं. स. इमारतीचा खर्च १५ कोटींवर कसा गेला? – परशुराम उपरकर*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.१२:* सावंतवाडी पंचायत समिती इमारतीच्या १५ कोटीच्या अंदाजपत्रकाला शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यावरून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर श्रेयवाद घेत आहेत. मात्र, पंचायत समिती इमारतीचा मूळ प्रस्ताव दोन कोटीचा असताना यात १२ कोटींची वाढ करण्यात आली. ती कशी काय करण्यात आली, असा सवाल उपस्थित करत ठेकेदारांचे भले करण्यासाठी केसरकर यांनी या प्रस्तावात वाढ केल्याचा आरोप मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी येथे केला. दरम्यान, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न अद्याप कागदावरच आहे. त्याचे बजेट ३० कोटी असताना तेदेखील आता १०० कोटीबाहेर जाईल. याला केसरकर जबाबदार राहतील, असा आरोपही उपरकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. उपरकर म्हणाले की, केसरकर यांनी घोषणा केलेल्या चष्मा कारखाना, रोप वे, मोनोरेल, तिलारी पार्कचे काय झाले, असा सवालही उपरकर यांनी यावेळी उपस्थित केला.
भाजप आणि शिवसेना सात वर्षे सत्तेत आहेत. मात्र, जिल्ह्यात कुठलीही विकासकामे आणली नाहीत. उलट त्यांच्यात आता श्रेयवादासाठी भांडणे सुरू आहेत, असा आरोपदेखील उपरकर यांनी यावेळी केला. मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, मनसे रस्ते सुविधा आस्थापना जिल्हा संघटक अभय देसाई, मनविसे जिल्हा सचिव नीलेश देसाई, माजी तालुका सचिव राजेश टंगसाळी, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष संदेश सावंत उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

