कोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

कृषी अधीक्षक कार्यालयाला टाळे ठोकणार- वैभव नाईक

*🟥कृषी अधीक्षक कार्यालयाला टाळे ठोकणार- वैभव नाईक*

*🟥फळपीक विम्याची रक्कम तात्काळ जमा करा!*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सिंधुदुर्गनगरी, दि.११:* आंदोलन करूनदेखील सरकार लक्ष देत नसल्याने आंबा, काजू पिक विम्याची १२० कोटीची रक्कम न मिळाल्यास १ नोव्हेंबर रोजी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिला आहे. आंबा व काजू पिक विमा योजनेत राज्य व केंद्र शासनाने आपल्या हिश्श्याचा विम्याचा ५३ कोटी रु. हप्ता विमा कंपनीकडे वर्ग न केल्याने शेतकरी पिक विमा नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची सुमारे १२० कोटी रु. रक्कम प्रलंबित आहेत. ही रक्कम गणपतीपूर्वी मिळावी, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलन केले होते. त्याचबरोबर सिंधुदुर्गातील
शेतकऱ्यांनीही आंदोलन केले होते. राज्याच्या कृषी मंत्र्यांचे लक्ष वेधल्यानंतर गणपतीपूर्वी विमा रक्कम देण्याची ग्वाही त्यांनी दिली होती. मात्र आता फळ पिकांचा नवीन हंगाम सुरू व्हायला आला, तरीही विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. औषध फवारणीसाठी, झाडांची देखभाल करण्यासाठी लागणारे पैसे आता शेतकऱ्यांकडे नाहीत. आंदोलने करून निवेदने देऊनही सरकार त्याकडे लक्ष देत नसल्याने १ नोव्हेंबर रोजी पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडून सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिला आहे. विमा रकमेसाठी आता आंदोलन करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!