आवाज दडपण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर!
*🟥आवाज दडपण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर!*
*🟥गणेश गावकर यांचा इशारा : आमदार राणेंबद्दलचे विधान झोंबल्याने मारामारीची घटना*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 देवगड, दि.११:* आमदार नीतेश राणे यांच्याबद्दल केलेले विधान भाजप कार्यकर्त्यांना झोंबल्यामुळे ग्रामीण रुग्णालयामध्ये आमदार राणे यांच्यासमोरच त्यांच्या कार्यकर्त्यांनी शाब्दिक बाचाबाची, मारामारीपर्यंत मजल मारली. अशा प्रकारची घटना देवगड तालुक्याच्या इतिहासात प्रथमच वैभव केळकर घडली आहे. आपल्याविरोधात आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न आमदार राणे व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. मात्र, यापुढे ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते हे सहन करणार नाहीत. त्यांना जशास तसे उत्तर देणार, असा इशारा ठाकरे युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी तालुकाप्रमुख जयेश नर, नगरसेवक संतोष तारी, उपतालुकाप्रमुख तथा नगरसेवक बुवा तारी, माजी नगरसेविका व महिला तालुका संघटक सौ. हर्षा ठाकुर, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष उमेश कुलकर्णी, उल्हास मणचेकर, तुषार भाबल, सजाऊद्दीन सोलकर, निनाद देशपांडे आदी उपस्थित होते. गावकर म्हणाले, ग्रामीण रुग्णालयाबद्दल, ग्रामीण रुग्णालयातील दूरवस्थेबाबत ठाकरे शिवसेना, काँग्रेसकडून सातत्याने आंदोलन केले जात आहे. आंदोलनादरम्यान मिळालेल्या आश्वासनांची पूर्तता झाली का? याची वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वीटकर यांना विचारणा करण्यासाठी आम्ही सोमवारी रुग्णालयात गेलो होतो. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही समर्पक उत्तरे मिळाली नाहीत. सायंकाळी रुग्णकल्याण समितीच्या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक येणारआहेत, अशी माहिती डॉ. वीटकर यांनी आम्हाला दिली होती. त्यासाठी सायंकाळी ४ वा. पदाधिकाऱ्यांसमवेत आपण रुग्णालयात गेलो होतो. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सकांना फोन केला असता त्यांनी आपण एका बैठकीत असून देवगडच्या मीटिंगबाबत आपल्याला काही माहित नसल्याचे सांगितले. यावरून डॉ. वीटकर आणि शल्य चिकित्सकांनी आमची फसवणूक केली, असा आरोप गावकर यांनी केला. दमदाटी करून आवाज दाबण्याचा प्रयत्न यापुढे शिवसेनेचे कार्यकर्ते सहन करणार नाहीत. त्याला जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही गावकर यांनी दिला.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

