कोकणक्राइममहाराष्ट्रसिंधुदुर्ग

आमदार नीतेश राणेंकडून जीवितास धोका!

आमदार नीतेश राणेंकडून जीवितास धोका!

सिंधुदुर्गनगरी

आमदार नीतेश राणे व त्यांचे खासगी सुरक्षा रक्षक आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्याकडून आपल्या जीवितास धोका असल्याची तक्रार ठाकरे शिवसेना शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
शिवसेना आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, युवा सेना जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक, कन्हैया पारकर, देवगड तालुका युवा सेना प्रमुख गणेश गावकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांची भेट घेतली व देवगडमधील घटनेची माहिती देत श्री. गावकर यांनी तक्रार दिली. तक्रारीत म्हटले आहे की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आम्ही पदाधिकारी असून देवगड ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकारी पदांच्या भरतीसाठी पाठपुरावा करीत आहोत. ९ ऑक्टोबर रोजी जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान देवगड रुग्णालयात भेट घेण्यासाठी आलो असता त्या
ठिकाणी स्थानिक आमदार नीतेश राणे, त्यांचे खासगी सुरक्षारक्षक तसेच काही गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते यांनी बेकायदेशीररित्या जमाव करून आपले अपहरण करण्याचा प्रयत्न, केला. नीतेश राणे आपला हात पकडून जबरदस्तीने इतर ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी स्थानिक पोलीस ठाकरे शिवसेना निरीक्षक नीळकंठ बगळे शिष्टमंडळाकडून बगळे हे बघ्याची भूमिका घेताना दिसून आले. बगळे पक्षपाती कारवाई करताना दिसून येत आहेत. या घटनेचे संपूर्ण चित्रीकरण प्रसारमाध्यमातून सर्वांच्या निदर्शनास आले आहे. सर्व घटनाक्रम लक्षात घेता आमदार राणे, त्यांचे खासगी सुरक्षा रक्षक व काही कार्यकर्त्यांपासून आमच्या जीविताबाबत दखलपात्र घटना घडण्याची तसेच मारहाण व जीवाचे बरेवाईट होण्याची शक्यता आहे. तरी याची दखल घेऊन आमदार राणे व खासगी सुरक्षारक्षक यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गावकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!