आ. नितेश राणे यांच्या माध्यमातील कांदा विक्रीला कणकवलीकरांचा उदंड प्रतिसाद..

▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण कोकणात भारत बंदचा उडाला फज्जा; भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली, दि.०८: सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण कोकणात भारत बंदचा फज्जा उडाला आहे. आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवलीत सुरू करण्यात आलेल्या कांदा विक्रीला जनतेने उदंड प्रतिसाद दिला आहे. भारत हा शेतकऱ्यांचा, जवानांचा कष्टकऱ्यांचा आहे. तो कधीच बंद होऊ शकत नाही, हे आज कणकवलीकरांनी दाखवून दिले असे भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मुंबई प्रदेश भाजपा ओबीसी सेल अध्यक्षनरेंद्र गावकर ,क्रीडा भरती अध्यक्ष रवींद्र कर्मलकर, रवी शेट्ये, शिशिर परुळेकर, रत्नागिरी प्रभारी आहे.प्रदेश भाजपने केंद्राच्या योजना यशस्वी करण्यासाठी मदत करणे जबाबदारी दिली आहे.कुळाला ५० टक्के देऊन प्रश्यूरांम घाटाचे काम सुरू झाले.शास्त्री पूल,संगमेस्वर मधील समस्या सोडविल्या. भारत बदला कांद्याच्या विक्रीने भारत बंदचा फज्जा उडाला आहे.शेतमाल थेट ग्राहकांकडे गेला तर शेतकरी आणि ग्राहकाला फायदा होतो.हेच म्हणणे शरद पवार आणि केंग्रेस चे म्हणणे आहे. महाविकास आघाडीला जन्माला घालणारे शरद पवार यांचे म्हणणे आहे.जे कॉग्रेस च्या मिनी मस्टर मंध्ये होते.तेच मोदी सरकारने मांडले आहे.कोकणात शेतकऱ्यांनी हा बंद झिडकरला आहे.
महामार्गाची बॉक्सवेल हटवून गर्डर टाकले जाणार आहे. टेक्निकल रिपोर्ट दिले आहेत.अहवाल गेला आहे.वाढीव तरतूद करण्यात आली आहे.कोविड मुळे अनेक फंड आरोग्यकडे वळविण्यात आले.त्यामुळे काही प्रमाणत काम हळू चालले आहे.रत्नागिरी ,रायगड पेक्षा सिंधुदुर्ग चे काम अधिक गतीने झाले आहे.

ही येथील जनतेची मानसीकता आहे.जे जनतेकडे शहाणपण आहे ते येथील खासदार विनायक राऊत यांच्याकडे नाही. अशी टीका भाजपा चिटणीस प्रमोद जाठर यांनी केली. २०२४ पूर्वी महामार्ग जनतेसाठी खुला होणार,मात्र  नानार रिफायनरी प्रकल्प झाला असता तर आर्थिक स्थिती सुधारली असती.नानार रिफायनरी विदर्भात नेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.मात्र आमचेच नाणे खोटे निघाले. खासदार विनायक राऊत निवडून देऊन आम्हीच आमच्या डोक्यावर पाप घेतले आहे.हे शिवसेना मंत्री, पालकमंत्री, खासदार ,आमदार हे कोकण विरोधी आहेत.म्हणून आज आयुर्वेद संशोधन केंद्राला आजून जागा मिळत नाही.भाजपाने प्रकल्प आणले, रस्ते आणले, रेल्वे आणतो मात्र त्या जनतेसाठी राबविण्याची कुवत नाही.नानार आणा हवेतर नोकर भरतीसाठी प्रमुख करा.आणि हवेतर पहिले शिवसेनेचे लोक भरती करा.तुम्ही जमिनी घेतल्या.मातोश्रीच्या नातेवाईकांनी घेतल्या, शिवसेनेने दलाली केली आणि प्रकल्प आणणारे दुष्मन काय?

१८,१९,२० डिसेंबर रोजी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत त्यात दिनप्रमुख म्हणून काम करण्याची संधी दिली आहे त्या बद्दल पक्षाचे आभार. कोकणातील जनता या भारत बंद मध्ये सहभागी झाली नाही त्याबद्दल जनतेचे आभार त्यांनी मांडले.

*_🧰💡आयटीआय मध्ये प्रवेश मिळाला नाही कशाला निराश होताय???…निश्चिंत रहा..मुक्त विद्यापीठ आपणास तंत्र शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे🤩😍_*

   *🧰डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन🧰*
_तंत्रशिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी_

💫आजच भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा!

*🏃🏻‍♂️प्रवेश सुरु*
*सावंतवाडी अभ्यास केंद्र संपर्क*
*_📱9422896699_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!