आ. नितेश राणे निकटवर्तीयांच्या ताब्यात असलेल्या सांगवे विकास सोसायटी मध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार..
▪️पुरवठा विभागाकडून जप्तीची कारवाई केली जात असून काही जणांवर गुन्हे दाखल होणार..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.०८: सांगवे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या रास्त धान्य दुकानातून मंगळवारी अडीच टन धान्य देवगडला पाठविण्यात येत होते. शासनाकडून कार्डधारकांना वितरित करण्यात येणारे मोफत धान्य काळ्याबाजारात विक्री करण्याचा प्रकार ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. सोसायटी’च्या रास्त धान्य दुकानातून अडीच टन धान्य तांदूळ घेऊन निघालेला टेम्पो ग्रामस्थांनी कनेडी बाजारपेठेत अडविला. त्यानंतर कणकवली तालुका पुरवठा विभागाकडून रास्त दुकान सीलबंद करण्यात आले. तसेच धान्यासह टेम्पो ताब्यात घेण्यात आला.
सांगवे गावातील ग्रामस्थांना रास्त धान्य दुकानातून अनेकवेळा धान्य उपलब्ध होत नाही. अशी वारंवार तक्रार होत होती. दुकानातून मोफत चे धान्य तालुक्याबाहेर नेले जाते अशी चर्चा होती. मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रास्त धान्य दुकानातून टेम्पोमध्ये तांदळाची पोती भरली जात होती. टेम्पो बाजारपेठेमध्ये आल्यानंतर बेनी डिसोजा, लॉरेन्स डिसोजा यांनी अडविला. टेम्पो चालकाने आपण देवगड येथील असल्याचे सांगितले. नागरिकांसाठी चे मोफत धान्य परस्पर काळ्याबाजारात विक्री केली जात असल्याचे उघड झाल्यानंतर बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी काही ग्रामस्थांनी स्वस्त धान्य दुकानाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला. लॉकडाऊन काळात गेले आठ महिने अशाप्रकारे परस्पर धान्य विकले जात असून त्यामधून लाखो रुपयांच्या गैरव्यवहार करण्यात आला आहे. यात मोठे रॅकेट आहे. आमदार नितेश राणे निकटवर्तीय असलेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत व माजी सभापती सुरेश सावंत यांच्या ताब्यात सांगवे विकास सोसायटी आहे. सोसायटीतील काही कर्मचारी धान्याचा काळाबाजार करत असतानाही त्याला एका स्थानिक नेत्याचे पाठबळ होते. पुरवठा विभागाकडून जप्तीची कारवाई केली जात असून काही जणांवर गुन्हे दाखल होणार आहेत.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

