कणकवलीराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

भाविकांच्या श्रद्धेची, भक्तीची मंदिरे महाराष्ट्रात सुरू होऊ शकत नाहीत, हे लाजिरवाणे दुर्दैव; माजी आमदार प्रमोद जठार

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी :  रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.२४: महाराष्ट्रात आज जर काँग्रेसचा मुख्यमंत्री असता आणि शिवसेना विरोधी पक्षात असली असती तर मंदिरांबाबत त्यांची हीच भूमिका असली असती का? हा खरा कळीचा मुद्दा आहे. आघाडीतल्या काॅंग्रेस पक्षांच्या इच्छेनुसार इथे महाराष्ट्रात दारूचे बार सुरू होतात, चित्रपटगृहे सुरू होतात, रेस्टॉरंटस आणि लॉजेस सुरू होतात. पर्यटन स्थळे, मस्तीचे धंदे जोरात सुरू होतात. पण भाविकांच्या श्रद्धेची आणि भक्तीची स्थाने असलेली मंदिरे महाराष्ट्रात सुरू होऊ शकत नाहीत, हे लाजिरवाणे दुर्दैव आहे. असे माजी आमदार प्रमोद जठार यांनी पत्रात म्हटलय.

ज्या जगदंबेचे नाव घेत, छत्रपती शिवरायांनी मंदिरांना सन्मान देणारे स्वराज्य महाराष्ट्रात निर्माण केले, त्याच महाराष्ट्रात नवरात्राच्या पवित्र वातावरणातही आज मंदिरे बंद आहेत. त्याच आई जगदंबेच्या दर्शनासाठी पुन्हा एकदा “दार उघड बये दार उघड” म्हणत टाहो फोडायची वेळ या ठाकरे सरकारने आणली आहे. केवळ स्वतःच्या सत्तेसाठी पांघरलेला हा शिवसेनेचा स्वार्थी दुटप्पीपणा उघड करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आता एल्गार पुकारला पाहिजे. दारूचे बार उघडे पण मंदिरांचे दरवाजे बंद ही स्थिती शिवरायांच्या महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे. आता ह्याला एकच पर्याय, जोपर्यंत भाविकांची श्रद्धास्थाने असलेली ही मंदिरे उघडली जात नाहीत. तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या जिल्ह्यात, तालुक्यात आणि गावागावात ,शहरा शहरात मंदीराच्या बाहेर रस्त्यावर महाआरतीची आता सुरुवात करावी लागेल! जोपर्यंत ठाकरे सरकार मंदिरांचे दरवाजे उघडणार नाही, तोवर महाराष्ट्रातील प्रत्येक मंदिरा बाहेर महाआरत्या करून या सरकारचा निषेध केला पाहिजे. जनतेच्या श्रद्धेच्या संयमाचा कडेलोट होऊ नये, भावनांचा अपमान थांबावा यासाठी भारतीय जनता पार्टीने आंदोलनाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात महाआरतीच्या घंटानादाने या सरकारचे बंद कान आणि बंद डोळे उघडायला भाग पाडावे, असे आवाहन भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार प्रमोद जठार यांनी भाजपा प्रदेशाध्यक्षांकडे पत्राद्वारे केले आहे. जोपर्यंत मंदिरे उघडणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही अशी निर्णायक भूमिका आता भाजपाने घ्यावीच, असे आग्रही आवाहन प्रमोद जठार यांनी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना केले आहे.

*_💥साजरी करा ही नवरात्री आणि दसरा उत्सव महाराष्ट्रातील नं.१ मोबाईल चैन SS ‘मोबाईल्स’च्या ‘दसरा ऑफर्स’ सोबत..💥_*

🔥ऑफर फक्त २१ ते २५ ऑक्टोबर पर्यंत..

*💫स्मार्ट फोन्सच्या खरेदी वर चक्क २९९९ रु. पर्यंतची हमखास भेट वस्तू..*
*💫स्मार्ट फोन्स वर चक्क ४० टक्के पर्यंत सूट..*
*💫ब्रँडेड ऍक्सेसरीज वर मिळवा आकर्षक सूट..*
*💫चक्क १० मिनटात लोन वरती फोन..*
*💫स्मार्ट टि.व्ही. फक्त ११९९० रु. पासून..*

🔥तर मग वाट कसली पाहताय! आजच भेट द्या आपल्या 💁🏻‍♂️ *SS COMMUNICATION स्टोअरला..*
*🌐www.ssmobile.com*

*🌈शाखा : सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, रत्नागिरी..*

*🏬Address :* Mudra Commercial Hub, Uchale Compound, Mumbai-Goa road, Kankavali.
*📱Mobile : 7030934427*

*🏬Address :* Patil Towers, Gavali Tittha, Near S.T Stand, Sawantwadi.
*📱Mobile : 7066755656*

*🏬Address :* Shop No, 4, Chintamani Plaza, Near Police Station, Kudal.
*📱Mobile : 8956931120*

*📱Head 0ffice : 8600666111*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!