मठ येथे तीन पानी जुगारावर वेंगुर्ले पोलिसांची अकस्मित धाड..
▪️सूर्यकांत खानोलकर, सिद्धेश ढवळे यांच्यावर मुंबई जुगार कलमांव्ये गुन्हा दाखल..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : वेंगुर्ले
🎴वेंगुर्ले,दि.०७: मठ सातेरी मंदिर नदीच्या माळरानावर मेणबत्तीच्या प्रकाशात चाललेल्या तीन पानी जुगारावर वेंगुर्ले पोलिसांनी अकस्मित धाड टाकली. या धाडीत अंधाराचा फायदा घेऊन जुगार खेळण्यास आलेले पळून गेले. मात्र, जुगार चालविणारे भटवाडी येथील सूर्यकांत सखाराम खानोलकर (वय३२) व सिद्धेश दीपक ढवळे (वय२९) यांना पोलिसांनी जुगार साहित्य व रोख रक्कम २७६० सह ताब्यात घेतले. या दोघांवरहि मुंबई जुगार कलमांव्ये गुन्हा दाखल झाला आहे.
मठ येथील सातेरी मंदिर नजीकच्या माळरानावर आज सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मेणबत्तीच्या प्रकाशात तीन पाणी जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळतात पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन सावंत पोलीस कर्मचारी अजय कांडर सुरज रेडकर, गौरव परब, बंटी सावंत, पप्प्या खडपकर या पथकाने धाड टाकली व संशयितांना रंगेहात पकडले. या दोन्ही जणांवर मुंबई जुगार अन्वये गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणाचा अधिक तपास हेडकॉन्स्टेबल सचिन सावंत करीत आहेत.
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

