महाराष्ट्रात सर्वाधिक भाताला दर सिंधुदुर्ग जिल्ह्यात; आमदार दीपक केसरकर
▪️कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना सभासद नोंदणीचा शुभारंभ..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.०७: कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष तथा सावंतवाडी तालुका निरीक्षक सतिश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हा संघटक सौ. जान्हवी सावंत व तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांच्या उपस्थितीत शिवसेना सभासद नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करतेवेळी आमदार दीपक केसरकर यांनी सर्वाधिक भाताला दर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला आहे. हे आपल्या पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आपल्या जिल्ह्यावर असलेल्या प्रेमामुळे तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून त्यासाठी ९६६ कोटी रुपये मंजूर केले. अशा पक्षप्रमुख श्री. ठाकरे यांचे हात अधिक मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून झालेली विकासकामे लोकांच्या निदर्शनास आणून जास्तीत जास्त सभासद नोंदणी करा असे आवाहन केले.
तर निरीक्षक तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांनी आपण नेहमीच चांगल्या गोष्टीला साथ देतो आणि शेतकऱ्यांचा कष्टाचे पैसे हे कोणाच्या दडपणाखाली चुकीच्या पद्धतीने वापरले जाऊन बॅंकेचे नुकसान होऊ नये यासाठीच शिवसेनेत आलो आणि याठिकाणी लोकांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. कुठलंही दडपण नाही. त्यामुळे अधिक जोमाने काम करण्याचा आनंद मिळतो. आज सभासद नोंदणीच्या निमित्ताने आपल्याला लोकांच्या गाठीभेटी घेण्याची संधी आली आहे. तेव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन सभासद नोंदणी करून शिवसैनिक बनवा ती आपली पक्षाची ताकद असेल आणि भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत आपण विजय संपादन करून दडपशाही करून अन्याय करणाऱ्यांना जिल्ह्यातून हद्दपार करु शकतो.
तर जिल्हाप्रमुख संजय पडते व महिला जिल्हा संघटक सौ जान्हवी ताई सावंत यांनी संघटनात्मक पद्धतीने कशा पद्धतीने काम करून जास्तीत जास्त सभासद नोंदणी होऊ शकतात याचे मार्गदर्शन केले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, चंद्रकांत कासार, महिला तालुका संघटक अपर्णा कोठावळे, उपतालुका प्रमुख बाळू माळकर, महिला उपतालुका संघटक चित्रा धुरी, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, पंचायत समिती सदस्य मेघश्याम काजरेकर, विभाग प्रमुख नामदेव नाईक, उपविभाग प्रमुख भरत सावंत, बाळु गवस, कोलगाव सरपंच शिवदत्त घोगळे, आंबेगाव सरपंच वर्षा वरक, कोलगाव शाखाप्रमुख सुधाकर चव्हाण, आंबेगाव दिपक नाईक, कुणकेरी भाई सावंत, कारिवडे बाळु कारिवडेकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_