कारिवडे गोसावी समाजाचे निवेदन : वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न होतोय!
*🟥कारिवडे गोसावी समाजाचे निवेदन : वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न होतोय!*
*🟥धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा दाखल करा!*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.०८:* कारिवडे गावचे जागृत देवस्थान श्री सिद्ध महापुरुष समाधी मंदिरातील धार्मिक वस्तूंची तोडफोड करून धार्मिक भावना दुखावणाऱ्या गणपत रामा गोसावी याला अटक करून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी कारिवडे गावातील गोसावी समाज व रहिवाशांनी सोमवारी पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. समाजातील ज्येष्ठ बाबीनाथ गोसावी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरिक्षक ऋषिकेश अधिकारी यांची भेट घेत देवस्थानची माहिती व गणपत गोसावी याच्याकडून समाजाला होणाऱ्या त्रासामुळे गावातील धार्मिक भावना व सामाजिक वातावरण बिघडविले जात आहे. पुढील महिन्यात धार्मिक उत्सव असून वातावरण बिघडू नये, यासाठी गणपत गोसावी याना अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी समाजबांधवांनी केली.
निवेदनात म्हटले आहे की, समाजाचे श्री सिद्ध महापुरूष समाधी मंदिर देवस्थान आहे. गावातील गणपत गोसावी ९ जुलैला सायंकाळी कोणतेही कारण नसताना व मंदिरात भाविक उपस्थित असताना दांडगाईने मंदिरात प्रवेश करून पुजारी बाबीनाथ गोसावी यांना अश्लील शिवीगाळ, मारहाण करून त्यांच्या गालाचा चावा घेत जखमी केले होते. तसेच गाभाऱ्यातील पवित्र त्रिशूल वाकवून व समाधीची विटंबना करून आमच्या उपासना स्थानाचे नुकसान करून त्यास अपवित्र केले आहे. मारहाणीबाबत गणपत गोसावी याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. परंतु त्याच्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. उलट गावात व समाजात वातारवण बिघडविण्याचे काम तसेच महिलांना शिवीगाळ करून धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिसांनी गणपत गोसावी याच्याविरोधात भारतीय दंड संहिता १८६० कलम २९५,२९५ अव २९८ या कलमाखाली गुन्हा दाखल करावा. तसेच मारहाण केल्याबद्दलही शिक्षा करावी. त्याला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी समाजबांधव बाबीनाथ गोसावी, दीपा गोसावी, गौरेश गोसावी, सिध्देश गोसावी, श्रवण गोसावी, बाबू गोसावी, प्रवीण गोसावी, प्रणय गोसावी, बाबली गोसावी, लवू गोसावी, सागर गोसावी, नारायण गोसावी, नंदिनी गोसावी, सुप्रिया गोसावी, सुष्मलता गोसावी, प्रतीक्षा गोसावी, वृषाली गोसावी, विजयालक्ष्मी गोसावी, संध्या गोसावी, वीणा गोसावी, राजश्री गोसावी, कविता गोसावी, अंकिता गोसावी, मनीषा गोसावी, आराधना गोसावी, सविता गोसावी, छाया गोसावी, सागर गोसावी, गंगाराम गोसावी, हेमंत गोसावी, अजय गोसावी, विष्णू गासावी, महोदव गोसावी, सहदेव गोसावी, यशवंत गोसावी, एकनाथ गोसावी, सूर्यकांत गोसावी, विशाल गोसावी, बाबुराव गोसावी आदी समाजबांधव उपस्थित होते. पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितले की, दोन दिवसात देवस्थानला भेट देऊन बांधवांशी संवाद साधू यापूर्वीच्या मारहाणप्रकरणी गोसावी याच्यावर कारवाई केली आहे. समाजाच्या भावनांची दखल घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
