आपत्कालीनकोकणदोडामार्गमहाराष्ट्र

कोलझर येथे लंपी आजाराने दुभत्या गायीचा मृत्यू

*🟥 कोलझर येथे लंपी आजाराने दुभत्या गायीचा मृत्यू*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴दोडामार्ग,दि.०८* लंपी आजारामुळे कोलझर येथील शेतकरी लक्ष्मण शंकर बोंद्रे यांची एक दुभती गाय दगावली आहे. अन्य जनावरेही लंपीबाधित असल्यामुळे कोलझर परिसरातील शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
सध्या महाराष्ट्रामध्ये गुरांना होणाऱ्या लंपी आजाराने थैमान घातले आहे. या आजारामुळे गुरे दगावत आहेत. अशा परिस्थितीत या दुभत्या गायीचा या आजाराने मृत्यू झाल्याने या भागातील शेतकऱ्यांमधे भीतीचे वातावरण आहे. लंपी आजारापूर्वी लसीकरण झाल्यामुळे या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला नाही. या आजारामध्ये वेळेवर उपचार झाले नाही तर गुरे दगावण्याचा संभव असतो. यापूर्वी या भागात किरकोळ गुरांना या
आजाराचा प्रादुर्भाव झाला होता. त्यानंतर काही गुरांना लसीकरण करण्यात आले होते. तरीही या आजाराची बोंद्रे यांच्या गुरांना लागण झाल्याने त्यांनी तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी यशवंत वझरेकर यांना याबाबत कल्पना दिली. वझरेकर . यांनी सर्व गुरांची तपासणी करून त्यांच्यावर उपचारही सुरू केले आहेत. कोलझर पंचक्रोशीतील इतर गुरांवर देखील लसीकरण करण्यात आले असल्याचे वझरेकर यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, शासनाने लंपी आजारामध्ये दगावणाऱ्या गुरांच्या मालकांना मोबदला देण्याचे जाहीर केले आहे. या दगावलेल्या गायीच्या मालकाला त्वरित मोबदला मिळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने तात्काळ शासन दरबारी प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी शेतक्रयांतून होत आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

   *🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫*  घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!