कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिक

गाबित समाजाचा जात पडताळणी प्रश्न निकाली काढा – नाईक

*🟥गाबित समाजाचा जात पडताळणी प्रश्न निकाली काढा – नाईक*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 मालवण, दि.०३:* जिल्ह्यातील किनारपट्टी भागात राहणाऱ्या गाबित समाजाच्या नागरिकांना जात पडताळणी करताना महसुली पुराव्याची येणारी अडचण दूर करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी बुधवारी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे चर्चा करताना गाबित समाजाला जात पडताळणीसाठी महसुली पुराव्याची अट शिथील करावी. तसेच महसुली पथकाने स्थळ पाहणी, गृह चौकशी करून गाबित समाजाची जात पडताळणी प्रकरणे निकाली काढावीत, अशी मागणी राज्य शासनाकडे केली. जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात मोठ्या संख्येने मच्छीमार असलेल्या गाबित समाजाच्या नागरिकांचे वास्तव्य आहे. मच्छीमारी करून आपला उदरनिर्वाह ते करतात.
गाबित समाजातील लोकांना पूर्वीचे जमीन मालक हे कबुली जबाबावरून किनारपट्टी भागातच झोपड्या बांधून राहण्यास देत होते. मच्छीमारी करणे सोयीचे असल्याने किनारपट्टी भागातच गेली अनेक वर्षे ते राहत आहेत. गाबित समाजाला शासनाने विशेष मागास प्रवर्ग म्हणून घोषित केले आहे. मात्र, त्यांच्या राहत्या जमिनी मालकी हक्काच्या नसल्याने मुलांचे शिक्षण व इतर कारणासाठी जात पडताळणी करताना त्यांना महसुली पुरावा जोडता येत नाही. त्यामुळे कायदेशीररित्या विशेष मागास प्रवर्ग किंवा केंद्र शासनाच्या मागासवर्गीय जातीसाठी असलेल्या आरक्षण सवलतींपासून वंचित राहवे लागत आहे. त्यामुळे गाबित समाजाच्या नागरिकांना जात पडताळणीसाठी महसुली पुराव्याची अट शिथील करावा, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_

*🏬Ready Possession Flat’s Available*

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777

*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!