कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 केर – भेकुर्लीच्या श्रावणधारा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात..

🟥 ४ ऑगस्टला होणार महोत्सवाचा शुभारंभ..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-०२:- दोडामार्ग तालुक्यातील आदर्शगाव अशी ओळख असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत केर – भेकुर्लीच्या श्रावणधारा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शुक्रवारी ४ ऑगस्टला या महोत्सवाचा शुभारंभ होणार असून मंत्री, लोकप्रतिनिधी ते प्रशासनातील अधिकारी यांना या सोहळ्यास आमंत्रित करण्यात आल्याची माहिती ग्रुप ग्रामपंचायत केर कडून सांगण्यात आले असून केर गाव या सोहळ्यास सज्ज झाला आहे. केर आणि भेकुर्ली गावातील अनेकांचा या सोहळ्यात सत्कार होणार असून अनेक कार्यक्रम तीन दिवस होणार आहेत.

शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता श्रावणधारा महाग्रामसभा महोत्सवाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यावेळी अतिरिक्त अधिकारी संजय कापडणीस, उपमुख्य का. अ. ग्रा. प. चे विशाल तनपुरे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा डॉ. उदय पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुहास गायकवाड, मृद व जलसंधारण अधिकारी आर. टी. धोत्रे, तहसीलदार संकेत यमगर, गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच जैवविविधतेच्या संगोपनातील रानभाज्या, औषधी वनस्पती, दुर्मिळ नाणी आदींचे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे.

शनिवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी आदर्श गाव समृद्ध शेतकरी संकल्प ग्रामसभा उद्घाटन सोहळा आदर्श गाव प्रकल्प पूर्ण तथा उपसंचालक रविकांत गौतमी यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. या सोहळ्यास भगीरथ प्रतिष्ठान झरापचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, जिल्हा कृषी अधीक्षक विजयकुमार राऊत, वनक्षेत्रपाल अनुप कन्नमवार, तालुका कृषी अधिकारी प्रमोद बनकर, बांधकाम विभागाचे अनिल बडे आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचे फलक लावून प्रदर्शन भरविण्यात आले आहे. तर सायंकाळी 6 वा. संयुक्त दशावतार यांचे ‘दक्षयज्ञ’ हे नाटक संपन्न होणार आहे.

रविवार दिनांक ६ ऑगस्ट रोजी महिला महाग्रामसभा आयोजित करण्यात आले असून या महाग्रामसभेचे उद्घाटन विभागीय पोलीस अधीक्षक संध्या गावडे यांच्या शुभहस्ते होणार आहे. या सोहळ्यात यशवंतराव भोसले पॉलीटेक्निक चराटे सावंतवाडीचे अध्यक्ष अस्मिता भोसले, पोलीस निरीक्षक अरुण पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर श्रावणणारा महाग्रामसभा महोत्सव सांगता कार्यक्रम जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तर सायंकाळी 6 वा. संयुक्त दशावतार यांचे ‘रथीसारथी संग्राम’ हे नाटक होणार आहे तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन केर ग्रामस्थांनी केले आहे.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

 

 

 

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

 

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓

*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*

*👉B.PHARM*

*👉M.PHARM*

•Pharmaceutical Chemistry

•Pharmaceutical Quality Assurance

•Pharmacology

*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

 

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

 

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*

•Electrician

•Wireman

•Human Resources Executive

•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*

🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय

🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध

🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा

🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*

_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

 

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*

📲9763824245

📲9420196031

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!