कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 आ. नितेश राणेंनी ना. गडकरींची घेतलेली भेट हि ओसरगाव टोलनाक्याचे टेंडर स्वतःच्या कंपनीला मिळविण्यासाठीच ; सुशांत नाईक

🟥 तळेरे-गगनबावडा रस्त्याचे टेंडर आपल्या ठेकेदाराला मिळण्यासाठीच आ. नितेश राणेंचा टेंडर रद्द करण्याचा प्रयत्न

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव

🎴कणकवली, दि-०१:- आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची घेतलेली भेट ही ओसरगाव टोलनाक्याचे टेंडर स्वतःच्या कंपनीला मिळावे यासाठी घेतली होती.अशी माहिती आम्हाला प्राप्त झाली आहे. परंतु नितेश राणेंनी टोलनाका सुरु करण्यासाठी कितीही आटापिटा केला तरी जोपर्यंत एम.एच ०७ गाड्यांना टोलमाफी होत नाही तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व युवासेना ओसरगाव येथील टोलनाका सुरू करू देणार नाही असा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिला आहे.

 

एकीकडे जिल्ह्यात टोलमाफी मिळावी यासाठी आमदार नितेश राणेंनी स्टंटबाजी करायची आणि दुसरीकडे ना. नितीन गडकरी यांची भेट घेऊन आपल्या कंपनीला ओसरगाव टोलनाक्याचे टेंडर मिळण्यासाठी आटापिटा करायचा हि राणेंची दुटप्पी भूमिका आहे. मागच्या वेळी सुरु केलेला टोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष,युवासेना व कृती समितीने धडक देऊन बंद केला.एम.एच ०७ गाड्यांना टोलमाफी जोपर्यंत मिळत नाही. महामार्गाचे अर्धवट असलेले काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलनाका आम्ही सुरू करू देणार नाही असे सुशांत नाईक यांनी सांगितले.

 

ना. गडकरी यांच्याशी घेतलेली भेट तळेरे – वैभववाडी- गगनबावडा रस्त्यासाठी होती असे राणेंनी प्रसार माध्यमांना सांगितले असले तरी त्यातही नितेश राणेंचा स्वार्थ दडलेला आहे. या रस्त्याचे टेंडर ४० टक्के बिलो दराने ठेकेदाराने भरले आहे. यात शासनाच्या निधीची बचत होणार आहे. मात्र अधिकाऱ्यांनी हे काम दर्जेदार आणि लवकरात लवकर करून घ्यावे. मात्र आ. नितेश राणेंच्या मर्जीतील ठेकेदाराला हे काम मिळाले नसल्याने ४० टक्के बिलोचे कारण देऊन हे टेंडर रद्द करण्याचा प्रयत्न आ. नितेश राणे करत आहेत. आणि जर हे टेंडर रद्द झाले तर अजून पुढील किती महिने हा रस्ता खड्डेमय राहिल हे सांगता येत नाही.त्यामुळे ज्या ठेकेदाराला हे टेंडर मिळाले आहे. त्याच ठेकेदाराकडून सरकराने हे काम करून घ्यावे. काम दर्जेदार न झाल्यास ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे आणि संबंधित अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्याची सक्त ताकीद सरकारने द्यावी अशी मागणी सुशांत नाईक यांनी केली आहे.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

 

 

 

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

 

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓

*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*

*👉B.PHARM*

*👉M.PHARM*

•Pharmaceutical Chemistry

•Pharmaceutical Quality Assurance

•Pharmacology

*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

 

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

 

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*

•Electrician

•Wireman

•Human Resources Executive

•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*

🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय

🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध

🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा

🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*

_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

 

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*

📲9763824245

📲9420196031

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!