कुडाळराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

कुडाळ शहरात शिवसेना सदस्य नोंदणी अभियान शुभारंभ..

▪️विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवा; जिल्हाप्रमुख संजय पडते यांचे आवाहन

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.०३: शिवसेनेतर्फे सदस्य नोंदणी शुभारंभ करत असताना टार्गेट ठेवून काम करा. कुडाळ शहरात शिवसेनेच्या माध्यमातून झालेली विकास कामे हि जनतेपर्यंत पोहोचवा. शिवसैनिकांनी एक दिलाने एका विचाराने काम करून प्रत्येक घराघरात शिवसेनेचा सदस्य बनवा. ‘शिवसेना आपल्या दारी’ हा कानमंत्र घेऊन शहरात जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करा, असे आवाहन जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केले.

यावेळी श्री. पडते म्हणाले, कुडाळ तालुक्याबरोबरच कुडाळ शहरात विकास कामांसाठी कोट्यावधी निधी हा आमदार, खासदार, पालकमंत्री यांच्या माध्यमातून शहरात देण्यात आला. जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली असून सिंधुदुर्ग वासियांची स्वप्नपूर्ती ठाकरे सरकारच्या माध्यमातून होत आहे. आमदार, खासदार, पालकमंत्री यांच्या प्रयत्नाने झालेली प्रत्येक विकास कामे हि जनतेपर्यंत पोहोचावणे हे आपले शिवसैनिकांचे काम आहे.

यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, तालुका प्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोबाटे, उपसभापती जयभारत पालव, अतुल बंगे, शहरप्रमुख संतोष शिरसाठ, विकास कुडाळकर, युवासेना शहर प्रमुख कृष्णा तेली, युवासेना जिल्हा समन्वय सुशील चिंदरकर, नगरसेवक बाळा वेंगुर्लेकर, सचिन कळप, जीवन बांदेकर, श्रेया गवंडी, प्रज्ञा राणे, मेघा सुकी, उदय मांजरेकर, चेतन पडते, राजू गवंडे व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!