शासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

कुणकेरी सरुंदेवाडी येथील उपरलकर देवस्थान कडे जाणारा रस्ता ग्रामस्थांनी स्वखर्चाने केला दुरुस्त..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत

🎴सावंतवाडी,दि.०३: कुणकेरी सरुंदेवाडी येथील  सूमारे १५० लोकसंख्या वस्ती असलेल्या वाडीत जाणाऱ्या रस्त्याच्या सुरुवातीलाच असलेल्या ओहोळावर अजून पर्यंत पूल न झाल्याने पावसाळ्यात या वाडीचा संपर्क तुटतो पावसाळ्यात पाळणेकोंड धरणाच्या ओवरफ्लो चे पाणी याच ओढ्यातून वाहत असल्यामुळे पाण्याचा मोठा प्रवाह असतो. सर्व लोकप्रतिनिधींना आजपर्यंत निवेदने देऊन त्याचा पाठपुरावा करून देखील याचा कोणताही परिणाम ह्या लोकप्रतिनिधींवर झाला नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांचे पावसाळ्यात फार मोठे हाल होतात. शेवटी कंटाळून या वाडीतील लोकांनी स्वखर्चाने या ओढ्यावर पाईप टाकून व खडी टाकून तात्पुरता पूल निर्माण केला. याचा उपयोग वाडीतील ग्रामस्थांसोबतच गावातील बऱ्याच लोकांची शेती या वाडीच्या पलीकडे असल्याने त्यांनाही होत आहे. याबद्दल ग्रामस्थांचे कौतुक करावे तेवढे थोडेच!

*_🧰💡आयटीआय मध्ये प्रवेश मिळाला नाही कशाला निराश होताय???…निश्चिंत रहा..मुक्त विद्यापीठ आपणास तंत्र शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे🤩😍_*

   *🧰डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन🧰*
_तंत्रशिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी_

💫आजच भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा!

*🏃🏻‍♂️प्रवेश सुरु*
*सावंतवाडी अभ्यास केंद्र संपर्क*
*_📱9422896699_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!