अखेर सात वर्षाच्या कालावधी नंतर ओबीसी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त; राजन रेडकर
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.०३: विभागीय जात पडताळणी समिती, रत्नागिरी येथे हिंदू-भंडारी, ओबीसी असल्याचे जात प्रमाणपत्र पडताळणी करून मिळण्याकरिता राजन बापू रेडकर, भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था, सीईओ कोकण विभाग व अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ, सिंधुदुर्ग संपर्क प्रमुख यांनी दिनांक ५ डिसेंबर २०१३ रोजी अर्ज सादर केला होता. संबंधित अधिकाऱ्यांनी सुनावणी दरम्यान मागणी केल्याप्रमाणे ओबीसी असल्याबाबतचे सर्व रीतसर कागदपत्रे राजन रेडकर यांनी जिल्हा जात पडताळणी समिती, सिंधुदुर्ग यांना सादर केली होती. जातीचा पुरावा म्हणून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची शहानिशा व पडताळणी करण्यास समितीस तब्बल सात वर्षाचा कालावधी लागला.
सिंधुदुर्ग जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त व सदस्य श्री. प्रमोद जाधव यांनी दिनांक १ डिसेंबर २०२० रोजी जवळपास सात वर्षाच्या कालावधी नंतर राजन रेडकर यांना हिंदू-भंडारी, ओबीसी असल्याचे जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा समितीकडून जात वैधता प्रमाणपत्र मिळल्याबाबत राजन रेडकर यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीला आपल्या जातीचा अभिमान हा असायलाच हवा, परंतु समाजात जातीपातीचे स्वार्थी राजकारण करण्यापेक्षा माणुसकी जपणे हे फार महत्त्वाचे आहे. तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असताना समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन, महाराष्ट्रातील ज्या थोर व्यक्तींनी जो समाज घडवला, त्या महापुरुषांच्या महान कार्याचा दृष्टीकोन नजरेसमोर ठेवून, सामाजिक बांधिलकी जपत, समाजात एकोपा निर्माण करणे हे प्रत्येक नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे, असे मत राजन रेडकर यांनी व्यक्त केले.

*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

