तोंडवलीत जमिनीच्या वादातून काकाला पुतण्याची मारहाण
तोंडवलीत जमिनीच्या वादातून काकाला पुतण्याची मारहाण
कणकवली
सामाईक जमिनीत कुंपण घालणे व पायवाट बंद करण्याच्या वादातून काका भालचंद्र शांताराम कुडतरकर (७०, रा. तोंडवली कुडतरकरवाडी) यांना पुतण्या विद्याधर जर्नादन कुडतरकर (५८) याने शिवीगाळ करीत मारहाण ‘केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास तोंडवली कुडतरकरवाडी येथे घडली. या प्रकरणी विद्याधर याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भालचंद्र व विद्याधर यांच्यात सामाईक जमिनीवरून वाद आहेत. भालचंद्र हे काजू लागवडीसाठी कंपाऊंड घालणे व पायवाट बंद करण्यासाठी गेले होते. त्यावेळी विद्याधर याने ‘सामाईक जमिनीचे वाटप झाले नसतानाही तुम्ही याठिकाणी कंपाऊंड घालून पायवाट बंद का करीत आहात?’ असे भालचंद्र यांना विचारले. यातून दोघांमध्ये शाब्दीक वाद झाला. या रागातून विद्याधर याने भालचंद्र यांना शिवीगाळ करीत बांबूच्या काठीने पायावर मारहाण करीत जखमी केले. याबाबत भालचंद्र यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार विद्याधर याच्याविरोधात भादंवि कलम ३२४, ५०२, ५०३ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

