कणकवलीकोकणक्राइममहाराष्ट्र

घरफोडीतील संशयिताकडे सोन्याची बिस्किटे ?

घरफोडीतील संशयिताकडे सोन्याची बिस्किटे ?

कणकवली

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने वागदे येथे बुधवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास कारवाई करीत घरफोडी प्रकरणातील एक संशयिताला ताब्यात घेतले. एलसीबीच्या पथकाकडून त्या संशयिताची चौकशी सुरू असून त्याच्याकडे पैसे व सोन्याचे दागिने असल्याची माहिती एलसीबीच्या पोलिसांनी दिली. सदर संशयिताकडे सोन्याची बिस्कीटे मिळाल्याची चर्चा परिसरात जोरदार सुरू होती, पण याविषयी माहिती देण्यास एलसीबीच्या पोलिसांनी नकार दिला. याबाबत पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्याशी संपर्क साधाला असता याबाबत आपणास काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. याकारवाई संदर्भात एससीबीचे पोलीस निरीक्षक भोसले यांच्याशी संपर्क साधला असता जिल्ह्यातील घरफोडी गुन्हांमधील एका संशयितास ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू असून त्याच्याजवळ पैसे व दागिने सापडून आले आहेत, असे भोसले यांनी सांगितले. मात्र, घडल्या कारवाईची वागदेसह नजीकच्या परिसरात चर्चा रंगली होती. कारवाईमागील वस्तुस्थिती पोलिसांनी उघड करावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!