कुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

आमदार नीतेश राणेंवर गुन्हा दाखल करा!

आमदार नीतेश राणेंवर गुन्हा दाखल करा!

कुडाळ

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत खालच्या पातळीवर आणि गलिच्छ भाषेत वक्तव्य करणाऱ्या भाजपचे आमदार नीतेंश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करा, अशी मागणी बुधवारी शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने कुडाळ पोलीस निरीक्षक वृणाल मुल्ला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. बुधवारी सायंकाळी युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट व शिवसेना नेते अतुल बंगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कुडाळ पोलीस ठाणे येथे निरीक्षक मुल्ला यांची भेट घेत निवेदनाद्वारे राणेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. नगरसेविका श्रृती वर्दम, ज्योतीजळवी, श्वेता गवंडे, सोशल मीडिया शिवसेना जिल्हाप्रमुख अनुराग सावंत, कुडाळ ओबीसी सेल शहरप्रमुख राजू गवंडे, युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, शिवसेना उपशहरप्रमुख गुरू गडकर, आंबडपालचे उपसरपंच गोट्या चव्हाण आदी उपस्थित होते.
शिवसेनेने निवेदनात म्हटले आहे, आमदार राणे यांनी आपली पातळी सोडलेली असून एकेरी भाषेत ठाकरेंचा उल्लेख केला आहे. शिवाय डरपोक, खोटारडा, निष्क्रिय अशा शब्दांनी त्यांना अपमानास्पद बोलून शिवसैनिकांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी चिथावणीखोर वक्तव्या केल्यामुळे शिवसैनिक नाराज झाले आहेत. म्हणून पुढील अनर्थ टाळण्यासाठी आमदार राणेंवर गुन्हा नोंद करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!