🟥 दिव्य ज्योती प्रशालेत पदवी समारंभ उत्साहात साजरा..
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-०८:-* आजचे युग हे स्पर्धात्मक युग आहे.क्षेत्र कोणतेही असो त्यात स्पर्धा ही आहेच.या स्पर्धेत टिकण्यासाठी आपण नेहमीच सज्ज असले पाहिजे. आपल्यातील गुणवत्ता शोधून त्या क्षेत्रात प्रगती साधा.तुमच्या मार्गदर्शक शिक्षकांच्या मदतीने तुमच्यातील संधी व कमतरता यांचा अभ्यास करा आणि तुमच्यातील कमतरतेचे गुणवत्तेत रूपांतर करा. तुमच्यातील कौशल्य विकसित करण्यासाठी शाळा वेळोवेळी तुम्हा विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देते,त्या संधीचं सोनं करा.शाळेतील शिस्त व गुणवत्ता टिकविण्यासाठी ज्या विद्यार्थी प्रतिनिधींची निवड केली आहे त्यांनी कर्तव्यदक्षतेने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडा आणि आपल्या प्रशालेचे नाव उज्वल करा.” असे विचार असे उद्गार अल्फोंसा स्कूलचे माजी मुख्याध्यापक फादर लिजो यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.दिव्य ज्योती येते संपन्न झालेल्या पदवी संपादन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे होते.
शनिवार दिनांक 8 जुलै रोजी प्रशालेच्या सभागृहात विद्यार्थ्यांचा पदारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला.यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे आल्फोन्सा स्कूल शाहूवाडी चे माजी मुख्याध्यापक फादर लिजो,दिव्य ज्योती स्कूलचे मुख्याध्यापक फादर बॅनेट,प्रशालेचे उपमुख्याध्यापक तथा असिस्टंट मॅनेजर फादर लिओ आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन पर कार्यक्रम सादर केले.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते 2023-24 या शैक्षणिक वर्षाच्या फनएथन या लोगोचे अनावरण करण्यात आले तसेच प्रशालेच्या विविध कार्यकारणीवर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बॅचेस देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
ऑलिंपियाड परीक्षेत गणित आणि इंग्रजी विषयांमध्ये राज्यामध्ये गुणवत्ता मिळवलेल्या कुमार मेघराज गवस,कुमारी अस्मी आईर तसेच कुमार अथर्व चिपळूणकर यांना प्रशस्तीपत्र व धनादेश देऊन गौरवण्यात आले.
इंडियन टॅलेंट ओलिंपियाड परीक्षेत दिव्य ज्योती प्रशालेने उत्तम प्रतिसाद व भरघोस यश मिळवल्याबद्दल प्रशालेला गोल्डन स्कूल अवार्ड देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले हा सन्मान प्रशालेचे प्रिन्सिपल फादर बेनेट यांनी स्वीकार केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या विद्यार्थिनी कु.स्वरा सातार्डेकर व कु.खुशी शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशालेचा विद्यार्थी प्रतिनिधी क्लिंटन फर्नांडिस याने केले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

