🟥 राज्यात निवडणुकांचा बिगुल वाजणार, निवडणूक आयोगाने दिले संकेत
🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴पुणे, दि-०७:-* राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडी सुरु आहेत. वर्षभरापूर्वी शिवसेना गटातून एकनाथ शिंदे गट वेगळा झाला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांचा गट वेगळा झाला. आता सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीसोबत राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत आला. सत्ताधारी पक्ष राज्यात अधिक मजबूत झाला. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने येत्या सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये निवडणुका घेण्याचे संकेत दिले आहे.
*कोणत्या होणार निवडणुका*
राज्यात 23 महानगरपालिकांची मुदत संपली आहे. त्यांच्या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत. तसेच 25 जिल्हा परिषदा आणि 207 नगरपालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदांच्या निवडणुका महत्वाच्या असतात. जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समित्यांच्या निवडणुका होतात. तसेच राज्यातील 92 नगरपरिषदांमधल्या ओबीसी राजकीय आरक्षणाचाही मुद्दा प्रलंबित आहे. या सर्व निवडणुकांची वाट स्थानिक पातळीवर पाहिली जात होती. आता निवडणूक आयोगाने राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान निवडणुका घेण्याची संकेत दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागण्याची शक्यता असल्यामुळे इच्छुकांनी तयारी करायला सुरुवात करायला हरकत नाही.
*राजपत्रात केला उल्लेख*
राज्य निवडणूक आयोगाच्या राजपत्रात निवडणुकीचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता आयोगाच्या राजपत्रात उल्लेख आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकींसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी अधिसूचित करण्यात येत असल्याचा देखील पत्रात उल्लेख केला आहे. हे परिपत्रक सोशल मीडियावरसुद्धा व्हायरल झाले आहे. ५ जुलै २०२३ रोजी काढलेले हे परिपत्रक आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने पावसाळानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे म्हटले होते.
*पुणे, मुंबई निवडणुका कधी होणार*
मुंबई, पुण्यासह राज्यातील महापालिकांच्या रखडलेल्या निवडणुका सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. तर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. या निवडणुका आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीमच असणार आहे.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

