सावंतवाडीचा बाळकृष्ण पेडणेकर ऑनलाईन बुदधिबळ स्पर्धेचा विजेता..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.०२: मुक्ताई कॅरम व बुदधिबळ कोचिंग अॅकेडमी आयोजित कै.सौ. सरोज सुर्यकांत पेडणेकर स्मृती प्रित्यर्थ पहिल्या जिल्हास्तरीय ऑनलाईन ब्लिट्ज बुदधिबळ स्पर्धेत सावंतवाडीचा बाळकृष्ण पेडणेकर विजेता ठरला. कै.सौ. सरोज सुर्यकांत पेडणेकर यांच्या एक्याऐशीव्या जयंती निमित्त जिल्ह्यात पहिल्यांदाच ऑनलाईन बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. श्री. सुर्यकांत पेडणेकर यांनी प्रायोजित केलेल्या या स्पर्धेसाठी कोल्हापुरचे आंतरराष्ट्रीय आर्बिटर श्री. भरत चौगुले यांनी मुख्य पंच आणि रत्नागिरीचे श्री. चैतन्य भिडे यांनी सहाय्यक पंच म्हणुन काम पाहीले. मुक्ताई अॅकेडमीचे आश्रयदाते सावंतवाडीतील राजघराण्याचे युवराज श्रीमंत लखमराजे भोंसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
रविवार दि. २९ नोव्हेंबर रोजी ऑनलाईन घेण्यात आलेल्या या स्पर्धेत सात राउंड खेळवण्यात आल्या. जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, देवगड, वैभववाडी इत्यादी सर्वच तालुक्यातुन मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले. एकूण बासष्ठ स्पर्धकांनी नावनोंदणी केली. मुख्य गटात पाच पारितोषिके आणि विदयार्थी गटात दहा, पंधरा, एकोणीस वर्षांखालील वयोगटात प्रत्येकी दोन आणि विदयार्थिनी गटात तेरा, एकोणीस वर्षांखालील वयोगटात प्रत्येकी दोन अशी एकूण पंधरा रोख पारितोषिके व प्रशस्तिपत्रके ठेवण्यात आली होती. सहभागी स्पर्धकांना ई-सर्टिफिकेट देण्यात आली.स्पर्धेसाठी मुक्ताई अॅकेडमीच्या संचालिका सौ. स्नेहा पेडणेकर, टेक्निकल पार्टनर उत्कर्ष लोमटे आणि मिडीया पार्टनर एपीम मालवणी यांचे सहकार्य लाभले.
मुख्य गट-प्रथम बाळकृष्ण पेडणेकर, सावंतवाडी रु. ५००
द्वितीय सुश्रुत नानल कणकवली रु. ४००, तृतीय जुई उबाळे, कणकवली रु. ३००, चौथा प्रणव आघाव कणकवली रु. २००, पाचवा सावळाराम वराडकर सावंतवाडी रु. १००.
१९ वर्षांखालील मुले- प्रथम जयदीप तायशेटे,कुडाळ रु. १००, द्वितीय विवेक चव्हाण कुडाळ रु. ५०.
१५ वर्षांखालील मुले- प्रथम स्वानंद जोशी कणकवली रु. १००, द्वितीय मयुरेश परुळेकर मालवण रु. ५०.
१० वर्षांखालील मुले- प्रथम रुद्राक्ष राठोड,कणकवली रु. १००, द्वितीय विभव राऊळ सावंतवाडी रु. ५०.
१९ वर्षांखालील मुली- प्रथम पल्लवी निरवडेकर सावंतवाडी रु. १००, द्वितीय घनिष्ठा राणे,सावंतवाडी रु. ५०.
१३ वर्षांखालील मुली- प्रथम गायत्री राठोड कणकवली रु. १००, द्वितीय भार्गवी गवस कणकवली रु. ५०.
लवकरच जिल्ह्यातील विदयार्थ्यांसाठी प्रत्येक तालुक्यात कॅरम व बुदधिबळ प्रशिक्षण आणि सेमिनारचे आयोजन करण्यात येईल. तसेच जिल्हास्तरीय ऑनलाईन आणि ऑफलाईन कॅरम व बुदधिबळ स्पर्धा घेण्यात येतील असे मुक्ताई अॅकेडमीचे संचालक कौस्तुभ पेडणेकर यांनी म्हटले.
*_🧰💡आयटीआय मध्ये प्रवेश मिळाला नाही कशाला निराश होताय???…निश्चिंत रहा..मुक्त विद्यापीठ आपणास तंत्र शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे🤩😍_*
*🧰डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन🧰*
_तंत्रशिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी_
💫आजच भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा!
*🏃🏻♂️प्रवेश सुरु*
*सावंतवाडी अभ्यास केंद्र संपर्क*
*_📱9422896699_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

