‘मुक्ताई अकॅडमी मुलांमधुन ग्रँडमास्टर घडवावा’ ; उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. रोहिणी सोळंके
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सावंतवाडी
🎴सावंतवाडी,दि.०२: येथे रविवार दि.३१ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय खुली बुदधिबळ स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.कोविड कालावधी नंतर प्रथमच प्रजासत्ताक दिनानिमित्त मुक्ताई अकॅडमी सावंतवाडी आणि श्री चेस अकॅडमी कणकवली यांच्या संयुक्त विदयमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष युवराज श्रीमंत लखमराजे भोंसले, प्रमुख पाहुणे सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ.रोहिणी सोळंके, सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे संस्थापक श्री.सुर्यकांत पेडणेकर, श्री चेस अकॅडमी संचालक श्री.सुशील निब्रे, श्री चेस अकॅडमी संस्थापक-नॅशनल आर्बिटर श्री.श्रीकृष्ण आडेलकर, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले. मुक्ताई अकॅडमी चे संचालक श्री.कौस्तुभ पेडणेकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यातील पंचावन्न स्पर्धकांनी सहभाग घेतला.
युवराज लखमराजे यांनी बुदधिबळ हा खेळ आपल्या आवडीचा आहे हे सांगतानाच त्यातील बारकावे आणि काही मजेशीर गोष्टी सांगितल्या.
डाॅ.रोहिणी सोळंके यांनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विदयार्थ्यांना मार्गदर्शन करतानाच मुक्ताई अकॅडमी चे कौतुक केले.मुलांनी अभ्यासाबरोबरच बुदधिबळ खेळातुन आपली प्रगती करावी. अकॅडमी ने मुलांमधुनच ग्रँडमास्टर घडवावा असे त्यांनी म्हटले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ युवराज श्रीमंत लखमराजे भोंसले, सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे संस्थापक श्री.सुर्यकांत पेडणेकर,श्री.सुशील निब्रे,नॅशनल आर्बिटर श्री.श्रीकृष्ण आडेलकर,इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
*पारितोषिक विजेते पुढील प्रमाणे*
●खुला गट –
प्रथम अभिषेक सांगळे,देवगड
द्वितीय सौरभ कानेटकर,देवगड
तृतीय बाळकृष्ण पेडणेकर,सावंतवाडी
चौथा अथर्व रानडे,देवगड
पाचवा तेजराज रेमुळकर,सावंतवाडी
●वीस वर्षांखालील मुले –
प्रथम शिवम पालव,कुडाळ
द्वितीय चिन्मय मोडक,सावंतवाडी
तृतीय मिहीर सकपाळ,देवगड
●तेरा वर्षांखालील मुले –
प्रथम सुश्रुत नानल,कणकवली
द्वितीय स्वानंद जोशी,कणकवली
तृतीय भावेश कुडतरकर,सावंतवाडी
●वीस वर्षांखालील मुली –
प्रथम जुई उबाळे,कणकवली
द्वितीय वैष्णवी तवटे,कणकवली
तृतीय पल्लवी निरवडेकर,सावंतवाडी
●तेरा वर्षांखालील मुली –
प्रथम विधी धामापुरकर,मालवण
द्वितीय तन्मयी सुर्यवंशी,कुडाळ
तृतीय तनिष्का आडेलकर,कणकवली
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
