संसार, आयुष्याचा सर्व नाश करे दारु बाटलीला स्पर्श नका करु*
*🟥 संसार, आयुष्याचा सर्व नाश करे दारु बाटलीला स्पर्श नका करु*
*🟥 वाढती व्यसनाधीनता युवा पिढी साठी, चिंताजनक*
*🟥 दारु सिगारेट,चरस,गांजा, याकडे, महाविद्यालयीन मुलांचा मोठा ओढा*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ संपादकीय : सीताराम गावडे*
*🎴सावंतवाडी, दि-२५:-* गेल्या अनेक वर्षापासून व दिवसांपासून मी खुप अस्वस्थ आहे. दारू पिऊन अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या घटना आता रोजचा भाग बनला आहे. लहान वयातली कोवळ्या पोरांपासून वृध्दांपर्यंत दारू पिणे आता सवयांचा भाग बनत चालला आहे. श्रीमंताने दारू पिली तर टेंशन घालवण्या साठी पितो असं गोंडस कारण दाखवलं जात. गरीब कष्टकऱ्यांला पिण्याबद्दल विचारल तर तो म्हणतो, थकवा घालवण्यासाठी प्यावी लागते. दारू पिणारा देखिल एक माणूस असतो. मात्र दारू पिऊन त्यात आकंठ बुडुन संसाराची राख रांगोळी – होतांना पाहावलं जात नाही. लहान लहान पोरांचा बाप दारु मुळे मेल्यावर त्यामुलांच्या भविष्य काय असेल या कल्पना देखील करवत नाही. कमी वयात विधवा बनणाऱ्या आपल्या बहिणी ला समाजात किती वाईट अनुभव रोज येतात या बद्दल कोण बोलणार? दारूचे व्यसन ही समाजाला लागलेली कीड आहे.
या दारूमुळे व्यक्ती निष्क्रिय, लाचार व गरीब बनतो स्वतःकडे असणारे जी काही संसाधने आहेत ती सर्व यात खर्च होतात.उदा: जमीन,दागिने,घरातील भाडे, पैसे इत्यादी.दारू हा वैयक्तिक समस्या नसून तो एक सामाजिक रोग आहे पाच दहा रुपयांसाठी भिक मागत हातपाय पसरणारी माणसं आपण पहिलेली असाल. या व्यक्तींना स्वतः चा आरोग्याचा कुटुंबाचा, प्रतिष्ठेचा आणि भविष्याचा कुठलाही विचार येत नसतो एका जनावरासारखे या व्यक्ती आपला आयुष्य घालवत असतात दारू पिणारा एकटा दारू नाही पीत. तो आपल्या बरोबर आणखी घेऊन जातो. लवकर सोबत मिळत नसतील तर तयार करतो म्हणजे एखाद्या साथी सारखा हा व्यसनी दुसरे व्यसनी तयार करतात यांचाकडे दारू पिण्यासाठी भरपूर कारण असतात गरिब सर्वसामान्याकडे अगोदरच कमी असलेला पैसा हे दारूवर खर्च करतात. प्रसंगी घरातील भांडी, मुलांचे पुस्तक बायकोचे दागिने या गोष्टी ही निलाजरे प्रमाणे विकतात मुलांचे शिक्षण निट होत नाही कि मुलीचा लग्न. संशोधनानुसार दारू पिणाऱ्या पित्याची मुलगा आपल्या पुढील आयुष्यात दारूचे व्यसनी बनण्याची शक्यता खूप असते. असे हे पिता पुत्राचे व्यसनाचे दुष्ट चक्र चालू राहते. आणि गरिबी आणखी बळकट होते.
गोवा बनावटीची दारू बऱ्याचदा विषारी असते. ती प्यालाने अपंगत्व अथवा मृत्यू होतो. याच दारूचे शरीरावर दूरगामी परिणाम होतात. पोट फुगणे पोटात पाणी होने लिवर खराब होणे यासारख्या समस्या नंतर वाढतात याचा कुटुंबावर आणखी आर्थिक ताण पडतो. व्यसनी व्यक्ती नेहमी कर्ज बाजारी असते
‘तरुण’ मुले खचलेल्या अवस्थेत आहेत. शिक्षण उपलब्धकरुन देणे, समाजास नवचेतना मिळेल, एक नवी दिशा मिळेल. बाबासाहेबांनी म्हटल्या प्रमाणे ‘शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा’..। याठिकाणी एक गोष्ट मला तुम्हांला सांगावीशी वाटते की दारू विकणाऱ्यांनी घरे बांधलेत आणि दारू पिणाऱ्याची घरे गहाण पडलीत. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो व्यसनाच्या आहारी गेलात तर ते व्यसन कधी तुम्हांला त्याचा आहार बनवेल हेदेखील कळणार नाही. भारत हा तरुणांचा देश आहे असे म्हटले जाते. परंतु या तरुणांचे छाती या दारूच्या व्यसनाने लोहाराच्या भात्यासारखी फूस फूस करायला लागलेली आहे.पालकांचेही मुलांच्या संवर्धनाकडे काहीसे दुर्लक्ष झाल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येते ज्या देशातील तरुणच पोकळ असतील त्या देशाची प्रगती कशी होईल. म्हणून दारूसारख्या व्यसनामुळे आयुष्याचा नाश करून घेऊ नका.. माझी दारू पिणाऱ्यांना एक नम्र विनंती आहे की दारू पिण्याआधी आपल्या घरी असलेल्या आपल्या माणसांचा थोडा विचार करा. तुमच्यावर अवलंबून असलेल्या तुमच्या मुला बाळांचा आणि त्यांच्या भविष्याचा थोडा विचार करा. दारूचे व्यसन करी घात व्यसनाच्या नादी लागू नका आयुष्य होईल बरबाद.. व्यसन कोणतही असलं तरी ते वाईटच व्यसना चे आपल्या शरीरावर आपल्या व्यवसायावर संबंधांवर वाईट परिणाम होतात याच प्रकारे दारूचे ही एक व्यसन आहे. दारूचे हे व्यसन आपल्या प्रगतीला वेसण घालते.दारूच्या व्यसना मुळे संसार उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आपल्याला गावागावांमध्ये पाहायला मिळते. दारुड्या माणसाच्या घरातील स्त्रिया ह्या नेहमी दुःखात वेदनेत सारख्याच दिसतात देवळांमध्ये ही एवढी गर्दी राहणार नाही इतकी गर्दी दारूच्या दुकानासमोर बघायला भेटते बघाना किती आश्चर्य आहे चांगल्या गोष्टी माणसाला शिकावे लागतात परंतु वाईट गोष्टी मनुष्य आपोआपच शिकून जातो.. दारूबंदी आणि दारूमुक्ती चळवळी महाराष्ट्रात सुरुवातीस वर्धा व आता गडचिरोली
जिल्ह्यात दारूबंदी आहे. बिहार, हरीयाना आंध्र प्रदेश आणि तामीळनाडू येथे काही काळ दारूबंदी होती. पण शासकीय दारूबंदीचे एकूण चरित्र संशयास्पद असते. दारूबंदी केवळ कागदावर होते.दारूचे दुकान उघडता येत नाही पण चोरटी दारू चालूच राहते. त्यासाठी पोलिस खाते आणि राजकारण भ्रष्ट होत जाते असा सर्वत्र अनुभव आहे. दारूचे अबकारी उत्पन्न ‘बुडाल्याने’ काही काळानंतर सरकार दारूबंदी उठवून मोकळे होते. बेकायदा दारू धंद्यावर स्थानिक गुन्हेगारी व भ्रष्टाचाराची विषवल्ली जोर धरते. हे सत्य पाहता दारूबंदी बरी की मोकळीक हवी हा वाद न मिटणारा आहे. धार्मीक चळवळी आणि स्त्रीचळवळींनी दारूबंदी (दारूपासून मुक्ती) आंदोलनात मोठी भूमिका बजावली आहे महाराष्ट्र- गुजरातमधल्या स्वाध्याय चळवळीने लाखो लोकांना दारूपासून सोडवले. महाराष्ट्रामध्ये वारकरी चळवळी ने देखील अनेकांना माळ घालून ‘दारू सोडणे’ हे चांगले असल्याचा मानदंड निर्माण केला.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_