कोकणात जाण्यासाठी मध्य रेल्वेकडून १५६ गणपती स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार

*🟥 कोकणात जाण्यासाठी मध्य रेल्वेकडून १५६ गणपती स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार*

*🟥 विशेष शुल्क आकारून सर्व गणपती स्पेशलसाठी बुकिंग 27 जून रोजी उघडणार*

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴रत्नागिरी, दि-२५:-* गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे बुकींग तात्काळ फूल झाल्याने चाकरमानी नाराज झाले होते.पण आता कोकणवासियांसाठी मध्य रेल्वने महत्वाची अपडेट दिली आहे. कोकणात जाण्यासाठी मध्य रेल्वेकडून १५६ गणपती स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहेत.

सप्टेंबर-२०२३ च्या गणपती उत्सवासाठी मध्य रेल्वेकडून १५६ गणपती विशेष गाड्या चालवणार येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे कोकणवासियांची नाराजी थोड्या प्रमाणात दूर झाली आहे. दरम्यान ही स्पेशल ट्रेन सेवा कशी असेल याबद्दल जाणून घेऊया.

1) मुंबई-सावंतवाडी रोड स्पेशलच्या ४० फेऱ्या होणार आहेत. यामध्ये 18 स्लीपर क्लास, एका गार्डची ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार असेल.

01171 स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 13 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत (20 फेऱ्या ) दररोज 00.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 14.20 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. तर 01172 स्पेशल सावंतवाडी रोडवरून १३ सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत (20 फेऱ्या) दररोज 15.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 04.35 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
ही ट्रेन दादर, ठाणे, पनवेल, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबणार आहे.

2) लोकमान्य टिळक टर्मिनस-कुडाळ- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेषच्या दोन्ही बाजुने मिळून २४ फेऱ्या होतील. या ट्रेनची संरचना एक दृतिया वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, 10 शयन्यान, 2 गार्डच्या ब्रेक व्हॅनसह 7 सामान्य द्वितीय श्रेणी अशी असेल.

01167 स्पेशल एलटीटी वरून 13, 14, 19, 20, 21, 24, 25, 26, 27, 28 सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये 1.10, 2.10.2023 (12 ट्रिप) रोजी 22.15 वाजता सुटेल आणि आणि कुडाळला दुसऱ्या दिवशी 09.30 वाजता पोहोचेल

01168 स्पेशल कुडाळ येथून 14, 15, 20, 21, 22, 25, 26, 27, 28, 29 आणि 2 आणि 3 ऑक्टोबर ला 10.30 वाजता सुटेल. (12 ट्रिप) त्याच दिवशी 21.55 वाजता एलटीटीला पोहोचेल.ही ट्रेन ठाणे, पनवेल, रोहा. माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी थांबेल.

3) पुणे-करमाळी/कुडाळ-पुणे विशेष ही 6 फेऱ्यांची असेल. यामध्ये एक दृतिया वातानुकूलित, 4 तृतीय वातानुकूलित , 11 शयन्यान, 6 जनरल सेकंड क्लाससह 2 गार्ड्स ब्रेक व्हॅन असेल. ही ट्रेन लोणावळा, पनवेल, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग या स्थानकांवर थांबेल.

01169 विशेष गाडी 15 ते 22 सप्टेंबर आणि 29 सप्टेंबर रोजी पुण्याहून 18.45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 10.00 वाजता कुडाळला पोहोचेल.01170 स्पेशल कुडाळहून 17.09.2023, 24.092023 आणि 01.10.2023 रोजी 16.05 वाजता सुटेल आणि पुण्याहून दुसऱ्या दिवशी 05.50 वाजता पोहोचेल.

4) करमाळी-पनवेल-कुडाळ विशेष (साप्ताहिक) ही 6 फेऱ्यांची असेल. यामध्ये एक दृतिये वातानुकूलित, 4 तृतीय वातानुकूलित , 11 शयन्यान क्लास, 2 गार्डच्या ब्रेक व्हॅनसह 6 सामान्य द्वितीय श्रेणी असेल. तसेच ही ट्रेन थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, काकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, रोहा आणि माणगाव या स्थानकांवर थांबेल.

01187 स्पेशल 16.09.2023, 23.09.2023 आणि 30.09.2023 (3 ट्रिप) रोजी करमाळी येथून 14.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 02.45 वाजता पनवेलला पोहोचेल.

01188 स्पेशल पनवेलहून 17 सप्टेंबर ते २४ सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर (3 ट्रिप) रोजी 05.00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 14.00 वाजता कुडाळला पोहोचेल.5) दिवा – रत्नागिरी मेमू स्पेशल दोन्हीकडून मिळून 40 फेऱ्यांची असेल. ही ट्रेन रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड या स्थानकांवर थांबेल.

01153 स्पेशल दिवा येथून 13.09.2023 ते 02.10.2023 (20 ट्रिप) दरम्यान 07.10 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 14.55 वाजता रत्नागिरीला पोहोचेल.

01154 विशेष गाडी 13 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर (20 ट्रिप) दरम्यान 15.40 वाजता रत्नागिरीहून सुटेल आणि त्याच दिवशी 22.40 वाजता दिवा येथे पोहोचेल.

6) मुंबई – मडगाव विशेष साप्ताहिक ४० फेऱ्यांची असेल. यामध्ये 18 शयनयान क्लास, एका गार्डची ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार असेल. तर ही ट्रेन दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी या स्थानकांवर थांबेल.

01151 स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 13.09.2023 ते 02.10.2023 (20 ट्रिप) पर्यंत दररोज 11.50 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 02.10 वाजता मडगावला पोहोचेल.01152 स्पेशल मडगावहून 13 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान (20 ट्रिप) दररोज 3.15 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 17.05 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल.

सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि मध्य रेल्वेची अधिकृत वेबसाइट www.irctc.co.in वर विशेष शुल्क आकारून सर्व गणपती स्पेशलसाठी बुकिंग 27 जून रोजी उघडणार आहे.

या विशेष गाड्यांच्या थांब्यांचा तपशीलवार वेळ अधिकृत वेबसाइट www.enquiry.indianrail.gov.in वर तपासता येणार आहे. किंवा NTES ॲप डाउनलोड करुन देखील तुम्हाला ही माहिती मिळणार आहे.

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_

*🏬Ready Possession Flat’s Available*

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777

*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!