बोलेरो गाड्यांची थकबाकी झाल्याने राणे समर्थकांना जिल्हा बँकेने बजावल्या नोटीस; आ.वैभव नाईक
▪️राणे समर्थकांची जळफळाट झाल्याने जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्यावर करताहेत खोटेनाटे आरोप..
▪️राणे समर्थकांनी कितीही खोटी बदनामी केली तरी जिल्हा बँकेची निवडणूक महाविकास आघाडीच जिंकणार; आ.नाईक यांचा विश्वास
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.०१: निवडणुकीच्या काळात ज्या बोलेरो गाड्या खरेदी करण्यात आल्या होत्या, त्यांची गेल्या सहा वर्षातील थकबाकी असल्याने खरेदी करणारे व त्याला जामीन राहणारे यांना जिल्हा बँकेने नोटीसा बजावल्या आहेत. हे सर्व राणे यांचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत. म्हणून त्यांचा जळफळाट झाला आहे व या जळफळाटातजन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्यावर खोटेनाटे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा एक कलमी कार्यक्रम विरोधकांनी आखला आहे. अशी जिल्हा बँकेची व सतीश सावंत यांची बदनामी करून निवडणूक जिंकता येणार नाही. तर कितीही खोटी बदनामी केली, तरी महाविकास आघाडीच जिल्हा बँक निवडणूक जिंकेल असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी बोलताना व्यक्त केला.
आमदार नाईक म्हणाले, जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूवर भाजपनेते आणि कार्यकर्त्यांकडून सतीश सावंत यांच्यावर टीका केली जात आहे. खोटेनाटे आरोपही केले जात आहेत. मात्र असे आरोप करून जिल्हा बँकेची निवडणूक विरोधकांना कधीच जिंकता येणार नाही. तर जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचाच झेंडा फडकणार आहे. जिल्हा बँकेवर टीका करणाऱ्या भाजपच्या रवींद्र चव्हाण यांनीही जिल्हा बँकेत येऊन कारभार पाहावा आणि नंतरच भाष्य करावे.
ते म्हणाले, सन २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणेंच्या कार्यकर्त्यांनी १३ बोलेरो गाड्या खरेदी केल्या होत्या. एकाच वेळी या गाड्यांची खरेदी झाल्याने निवडणूक आयोगाने या गाड्या जप्त करण्याचे निर्देश पोलिस प्रशासनाला दिले होते. त्यानुसार या सर्व गाड्या जप्त करण्यात आल्या. या गाड्यांसाठी जिल्हा बँकेकडून कर्ज उचल झाली असून राणेंचे कार्यकर्ते हेच या गाड्यांचे खरेदीदार आणि जामीनदार आहेत. गेल्या सहा वर्षात बोलेरो गाड्यांच्या कर्ज प्रकरणाची परतफेड न झाल्याने जिल्हा बँकेने कर्जदार आणि जामीनदारांना नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसांमुळे बिथरलेले राणेंचे कार्यकर्ते सतीश सावंतांना बदनाम करण्यासाठी टीका करत आहेत. मात्र, कुणी कितीही टीका केली तरी शिवसेना सतीश सावंतांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे.
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_