डेगवे रस्त्यालगत’ संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू
डेगवे रस्त्यालगत’ संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू
सावंतवाडी
तिलारी – वेंगुर्ले नळयोजनेसाठी डेगवे येथे जलसंचय टाक्यासाठी करण्यात आलेल्या खोदाईमुळे डोंगर खचण्याची भीती लक्षात घेऊन बांदा-दोडामार्ग मार्गावर जीवन प्राधिकरणच्या जलसंचय टाक्यांच्या टाक्यांच्या खालच्या बाजूला रस्त्यालगत संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
योजनेसाठी सासोलीतून या वेंगुर्ले, मालवणकडे नेल्या जाणाऱ्या पाण्यासाठी डेगवे येथे बांधण्यात आलेल्या टाक्या आणि पंप हाऊससाठी डोंगराची खोदाई केली आहे. पावसाळ्यात डोंगर खचून बांदा दोडामार्ग रस्ता बंद होण्याची भीती आहे. सुरक्षिततेसाठी तेथे मजबूत संरक्षक भिंत बांधण्याची मागणी शिवसेनेचे उपविभाग प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य विजय देसाई यांनी केली होती.
