महाराष्ट्ररत्नागिरीशासकीय

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च, एप्रिलचे मानधन जमा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च, एप्रिलचे मानधन जमा

चिपळूण

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे रखडलेले मार्च व एप्रिल महिन्याचे अर्धे अर्धे मानधन आता त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला असला तरी मे महिन्याच्या मानधनाची अजूनही प्रतीक्षा आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपर्यंत जमा करा, असे आदेश न्यायालयाने काही वर्षापूर्वी दिले आहेत. त्यानुसार मानधन जमा होईल, असे आश्वासन शासन देत आहे. मात्र त्याची प्रत्यक्षात आजतागायत अंमलबजावणी झालेली नाही. मध्यंतरी एप्रिल महिना संपत आला तरी मार्च महिन्याचे मानधन जमा झाले नव्हते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या संघटनेने या बाबत शासनाला जाब विचारल्यानंतर दोन्ही महिन्याचे अर्धे अर्धे मानधन जमा करीत एप्रिल महिन्यात उर्वरित मानधन व एप्रिलपासून वाढीव मानधन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात जून महिन्यात मार्च व एप्रिल महिन्याचे राहिलेले अर्धे-अर्धे मानधन स्थानिक एकात्मिक बालविकास विभागाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!