महिलेसह दोन युवकांचे मोबाईल कॉल डिटेल्स तपासणार
महिलेसह दोन युवकांचे मोबाईल कॉल डिटेल्स तपासणार
कुडाळ
कुडाळ शहरात झालेल्या श्वेता भगवान आखाडे-शेख हिच्या आत्महत्या प्रकरणी पोलीस या महिलेसह त्या दोन युवकांचे मोबाईल कॉल डिटेल्स तपासणार आहेत.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही घटना आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पती व अन्य नातेवाईकांची तक्रार नसल्याने चर्चेत असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. तरीही कॉल डिटेल्समुळे काही वेगळी माहिती मिळते का?, यादृष्टीने पोलीस तपास करणार आहेत.
श्वेता. आखाडे (२५, रा. पवई- मुंबई) हिचा मृतदेह कुडाळ येथील हॉटेल अभिमन्यूमध्ये गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला होता. श्वेता हिचा पती फिरोज शेख याच्याशी गुरुवारी मध्यरात्रीनंतर मोबाईलवर तिचे बोलणे सुरू असताना घरगुती कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता. आपण आत्महत्या करते, असे तिने सांगितले. पंख्याला बांधलेला फास दाखविला, असे फिरोज याने पोलिसांना सांगितले. त्यावरून तिने आत्महत्या केल्याचे प्राथमिक
तपासात स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती.
आत्महत्या असली, तरी तपास सुरू कुडाळ तालुक्यातील दोन युवक तिच्या संपर्कात असल्याचे पुढे आल्याने चर्चा व तर्कवितर्कांना उधाण आले होते. त्या युवकांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. श्वेता हिने आत्महत्या केली असल्याचे समोर आले असले, तरी पोलिसांनी तपास सुरूच ठेवला आहे.
