आरोग्यमहाराष्ट्रसावंतवाडी

सावंतवाडीतील आयुष निदान, उपचार शिबिराला प्रतिसाद

सावंतवाडीतील आयुष निदान, उपचार शिबिराला प्रतिसाद

 

ओटवणे

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आयोजित आयुष निदान व उपचार निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचे उद्घाटन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी जिल्हा आयुष अधिकारी डॉ. कृपा गावडे, आयुष अधिकारी डॉ. योगेश गोडकर, योग निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. साधना गुरव, डॉ. वजराटकर, भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. संजय दळवी, डॉ. साईनाथ सीतावार, आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी पूजनाने झाली. नंतर डॉ. कृपा गावडे यांनी यावर्षी नववा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार असून प्रत्येकाने रोज योगा केला पाहिजे. तसेच आरोग्यदायी व सुखी जीवनासाठी योगा करावा, असे आवाहन केले. यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांनी आयुर्वेद व होमिओपॅथिक निदान व उपचार चिकित्सा तसेच योग प्रात्यक्षिकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. प्रास्ताविक डॉ. नीलेश अटकं यांनी, सूत्रसंचालन डॉ. सागर जाधव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!