झोपडी जळालेल्या कुटुंबाला मदतीचा हात
झोपडी जळालेल्या कुटुंबाला मदतीचा हात
सावंतवाडी
सामाजिक बांधिलकीच्यावतीने
संकटात असलेल्या कुटुंबाला जीवनावश्यक वस्तू व रोजगाराचे माध्यम देण्यात आले.
महिनाभरापूर्वी बाहेरचावाडा- सावंतवाडी येथील झोपडीला आग लागून झोपडी जळून कष्ट करून मिळवलेल्या संसारातील सर्व वस्तू व रोजगाराचे माध्यम असलेली शिलाई मशीनसह लग्नसराईत ग्राहकांचे शिवणकामासाठी घेतलेले कपडे जळून खाक झाले होते. तेव्हा त्या गरीब कुटुंबावर फार मोठे संकट ओढवले होते. आज सामाजिक बांधिलकीने मदतीचा हात दिला. जीवनावश्यक वस्तू, भांडीकुंडी व रोजगाराचे माध्यम म्हणून व
त्यातूनच कष्ट करून आपल्या जीवनाची पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी शिलाई मशीन सुपूर्द केली. या मदतकार्यासाठी भांड्यांच्या स्वरुपात दत्तप्रसाद गोठोस्कर व अपर्णा कोठावळे यांचेही सहकार्य लाभले. सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते संजय पेडणेकर, प्रा. सतीश बागवे, प्रा. शैलेश नाईक, प्रा. प्रसाद कोदे, समिरा खलील, शेखर सुभेदार, शरद पेडणेकर, हेलन निब्रे, अशोक पेडणेकर, श्यामराव हळदणकर व रवी जाधव संकटात असलेल्यांना यथाशक्ती मदतीचा हात देऊन त्यांना त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात. याप्रसंगी फूल विक्रेते प्रसाद परब उपस्थित होते.
