“आम्ही कणकवलीकर” यांच्या वतीने २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली..
▪️पोलीस ठाण्याच्या आवारात वंदे मातरम् लिहत मेणबत्ती प्रज्वलित करून उपस्थितांनी नतमस्तक होऊन घेतली संविधानाची शपथ..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.२६: २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मृतींना उजाळा देत गुरूवारी संविधानदिनी कणकवली वासीयांनी श्रद्धांजली वाहिली. कणकवली पोलीस ठाण्याच्या आवारात वंदे मातरम् लिहत मेणबत्ती प्रज्वलित करून उपस्थित सर्व नागरिक नतमस्तक झाले. तसेच यावेळी संविधानाची शपथही घेण्यात आली.
“आम्ही कणकवलीकर” यांच्या वतीने या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी मेणबत्ती प्रज्वलित करून ‘वंदे मातरम्’ ची प्रतिकृती साकारण्यात आली होती. यावेळी ब्रिगेडियर सुधीर सावंत, पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, पोलीस उप. निरीक्षक बापू खरात, अनमोल रावराणे, नगरसेवक सुशांत नाईक, आबा दुखंडे, भास्कर राणे, दादा कुडतडकर, हनिफ पिरखान, संजय मालांडकर, पंकज दळी, संजय राणे, बाळू मेस्त्री, अशोक करंबळेकर, श्याम सावंत, सरिता पवार, सुप्रिया पाटील, प्रदीप मांजरेकर, उपसरपंच वैद्यही गुडेकर, पत्रकार गणेश जेठे, विजय गांवकर, अजित सावंत, भगवान लोके, राजन चव्हाण, संतोष राऊळ, अनिकेत उचले, सादिक कुडाळकर, अनुप वारंग, गिताजली कामत, प्रभाकर कोरगांवकर, रिमेश सावंत, सुधाताई हर्णे, दादा बेलवलकर, संदीप कदम, डॉ.सुहास पावसकर यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि कणकवलीतील अन्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना बि. सुधीर सावंत, अशोक कंरबळेकर, पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी मनोगत व्यक्त केले. सरिता पवार यांनी संविधानाचे वाचन केले. यावेळी श्याम सावंत यांनी निवेदन तर अशोक करंबेळकर यांनी प्रस्तावना केली.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_


या पोलिसाना त्याचं काय आहे काय? कणकवलीत किती कसाब आहेत माहित आहे काय?त्यांच्यावर कारवाई हे पोलिस करतात का?मग हे काय? ब्रि.सुधीर सावंत साहेब हे पोलिस काहिही करत नाहि.मी गेली वीस वर्षे पोलिसांची वाट बघतोय हे आलेले नाहित.ते कसाबच आहेत ज्यानी माझं नुकसान केलं.ह्या पोलिसानी बघ्याची भुमीका घेतलेली आहे.मी संपलेलो आहे.अशी मेणबत्ती लाऊन काय होणार.मेणबत्ती लाऊन झाल्यावर जाऊन झोपणार.गुन्ह्यांच्या वीरूद्ध कारवाई होणार आहे काय?