कोकणसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

शिवतेज प्रतिष्ठान नेनेवाडी येथील युवकांनी केला श्रमदानातून रस्ता..

चौकूळ नेनेवाडी येथील युवकांचे काम प्रेरणादायी.

प्रतिनिधी:- केशव जाधव

सावंतवाडी ,चौकुळ:२४ – शिवतेज प्रतिष्ठान नेनेवाडी चौकुळ नवतरुण युवक मंडळाकडून श्रमदानातून रस्त्यावरील खड्डे बुजवून एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.
चौकुळ हे गाव तंटामुक्त गाव म्हणून प्रसिद्ध आहे, या गावांमध्ये कोणतेही वाद विवाद निर्माण झाल्यास ते गावातच बैठक घेऊन सोडवले जातात, व गावचा तंटा वेशीभाहेर जाण्यापासून रोखला जातो.चौकुळ गावचे तरुण युवक स्वकष्टाने अंगमेहनत करुन रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम करीत आहेत, त्यांना या कामी राकेश गावडे यांनी मार्गदर्शन केले तर प्रमोद परब ,वैभव गावडे ,बाळकृष्‍ण गावडे ,सुरेश गावडे ,कृष्‍णा परब, आकाश गावडे रघुनाथ गावडे ,ओंकार गावडे ,यांनी या श्रमदानात कार्यात भाग घेतला व रस्ता वाहतुकीस पूर्ववत केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!