लॉकडाऊन काळातील वाढीव वीज बिलासंदर्भात वेंगुर्लेत मनसे आक्रमक..
▪️वीज वितरण कार्यालय येथे खळखट्याक आंदोलन करणार असल्याचा तालुकाध्यक्ष सनी बागकर यांचा इशारा..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : शुभम वैद्य
🎴वेंगुर्ले,दि.२२: पक्ष अध्यक्ष राज ठाकरे विज बिलासंदर्भात जो निर्णय देतील त्यावर मनसे वेंगुर्ले तालुक्याच्या वतीने वीज वितरण कार्यालय वेंगुर्ले येथे खळखट्याक आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सनी बागकर यांनी दिला.
वीज बिलांबाबत अद्याप पर्यंत राज्य शासनाकडून कोणतेही धोरण ठरलेले नाही. त्यामुळे वीज अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारे ग्राहकांवर सक्ती करू नये, अन्यथा मनसे स्टाइल शॉक देऊ असा इशारा मनसेचे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सनी बागकर यांनी आज येथे दिला. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.
त्यात तसे नमूद करण्यात आले की, लॉकडाऊन दरम्यान जनतेला वाढीव बिल माफ व्हावे यासाठी आम्ही अनेक आंदोलने केली काहीवेळा आमच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेतला. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनाही याबाबत पत्र लिहिले; पण त्यावर अद्याप काहीच तोडगा निघालेला नाही. ऊर्जा मंत्र्यांनी वीज बिल माफ होणार नाही, असं जाहीर केलं. जर लोकांकडून बळजबरीने वीजबिल घेतलं जाणार असेल तर तुमची गाठ मनसेशी आहे. हे लक्षात ठेवा. असं श्री बागकर यांनी म्हटलं आहे लोकांनी वीज वापरली असेल तर बिल भरावाच लागेल विज बिल आज कुठलीही माफी अथवा सवलत नाही असं विधान ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केले होतं त्यानंतर वीज बिलाच्या मुद्द्यावरून रान उठले आहे. आम्ही वीज बिल भरणार नाही सक्तीची वसुली करून बघा जशास तसे उत्तर देऊ अशी भूमिका मनसेने घेतली असल्याचे श्री. बागकर यांनी म्हटले आहे.
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_