अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील देवेंद्र भोई आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा

 

 

सिंधुदुर्ग पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी पाहिले होते काम.

*सिंधुदुर्ग, दि.२९:-* अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील विजापूर येथील देवेंद्र राजेंद्र भोई या आरोपीला जिल्हा न्यायालयाने मंगळवारी सुनावली मरेपर्यंत (आजन्म) करावासाची शिक्षा याकामी तत्कालीन चोपडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी व आताचे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी या प्रकरणाचा तपास केला होता. तर हे प्रकरण 2019 मध्ये घडले होते.आरोपीला मरेपर्यंत (आजन्म) करावासाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावल्यामुळे पिडीत कुटुंबाला न्याय मिळाला आहे. तर तपासी अधिकारी सौरभकुमार अग्रवाल यांचे जळगाव जिल्ह्यासह चोपडा तालुक्यात तसेच विजापूर गावात कौतुक व अभिनंदन होत आहे.चोपडा ग्रामीण सीसीटीएनएस गु.र. नं. 68/2019 कलम 307, 376 A B 363, 366, 341, 323 IPC 4,8,12 5M POCSO, वगैरे या दाखल गुन्ह्यातील आरोपीचे नाव देवेंद्र राजेंद्र भोई वय 24 रा. वैजापूर ता. चोपडा यास शनिवार दि. 28 मार्च 2023 रोजी मा. अति. सत्र न्यायालय अमेळनेर यांनी मरेपर्यंत (आजन्म) करावासाची शिक्षा सुनावली आहे.

हा गुन्हा WPSI अर्चना करपुडे यांनी दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा पुढील तपास तत्कालीन चोपडा पोलीस ठाणे हद्द उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सौरभकुमार अग्रवाल यांनी करुन आरोपी देवेंद्र राजेंद्र भोई रा. वैजापूर ता. चोपडा यास अटक केली होती.

सदर गुन्हयातील आरोपीत यास मा. सत्र न्यायालय अमळनेर, श्री. पी. आर. चौधरी यांनी दोषी ठरवुन त्यास शनिवार दि. 28 मार्च 2023 रोजी मरेपर्यंत (आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सदर गुन्ह्याचे कामी सरकारी वकिल श्री. के. एल. बागुल यांनी यशस्वी युक्तिवाद केला. यातील तपासिक अधिकारी श्री. सौरभकुमार अग्रवाल यांची साक्ष व गुन्ह्याचे तपासकामी गोळा केलेले पुरावे महत्वाचे ठरले. या केस मध्ये पेरवी अधिकारी म्हणून स. फौ. उदयसिंग साळुंखे, नेमणुक पारोळा पो. ठाणे यांनी काम पाहीले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!